Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला सरकारमधून मोकळं करा’; देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

लोकसभेच्या काल लागलेल्या निकालात महाराष्ट्रातून भाजपला मोठे अपयश मिळाल्याचे दिसून आले. त्यातून आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jun 05, 2024 | 08:04 PM
Devendra Fadnavis' big statement after Lok Sabha results

Devendra Fadnavis' big statement after Lok Sabha results

Follow Us
Close
Follow Us:

After Lok Sabha Results Fadnavis Big Statement : लोकसभा निवडणुकीचा काल आलेला निकाल (After Lok Sabha Result) भाजपसाठी खूपच धक्कादायक होता. त्यात महाराष्ट्रात (Maharashtra Politics) भाजपला (BJP) मोठे अपयश मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये महायुतीला स्पष्टपणे जनतेने नाकारल्याचे दिसून आले.

देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी

ज्या भाजपला 2019 साली 23 जागा मिळाल्या होत्या त्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षश्रेष्ठींना विनंती केली की, मला आता सरकारमधून मोकळं होण्याची परवानगी द्यावी. विधानसभेसाठी मला तयारी करण्याची गरज असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.

#WATCH | Mumbai: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis says, "…This debacle that happened in Maharashtra, our seats have reduced, the entire responsibility for this is mine. I accept this responsibility and will try to fulfill whatever is lacking. I am not a person who will… pic.twitter.com/ypJzTTXHf4

— ANI (@ANI) June 5, 2024

महाराष्ट्रातील या गोष्टींवर आम्ही कमी पडलो
शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर आम्ही प्रभावी उपाय देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आम्ही योग्य तोडगा लवकर काढायला कमी पडलो. हे आमच्या पराभवाचे कारण ठरले. त्यानंतर विरोधकांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता. यामध्ये संविधान बदलाचा मोठा नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केला होता.

तो काऊंटर अटॅक करायला आम्ही कमी पडलो. त्याचबरोबर काही ठिकाणी आम्ही उमेदवार द्यायला उशीर केला. काहींची इनकमिंग आमच्यासाठी चुकीची ठरली अशी अनेक कारणे आमच्या पराभवाला असल्याचे दिसून येतेय. याचा सर्वाचा विचार आम्ही करणार आहोत, असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सरकारमधून बाहेर पडण्याची विनंती

आम्हाला मते मागच्या एवढीच मते पडली, त्यांचे टक्केवारी काही अंशांनी कमी पडली. परंतु, आमची सिट निश्चित कमी झाली आहेत. त्याचबरोबर या पराभवाची मी नक्कीच जबाबदारी घेतोय. मी पळून जाणारा माणूस नाही. त्यानंतर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची विनंती केली आहे. हे सगळ्यात मोठे वक्तव्य त्यांनी भर पत्रकार परिषदेत केले.

सरकारमधून मोकळं करावे ही विनंती

माझ्या वरिष्ठांना मी विनंती करतो, आता मला विधानसभेकरिता पूर्णवेळ उतरायचे आहे. मला सरकारमधून वेगळे करावे, जेणेकरून मला तिथे काम करता येईल. मला सरकारमधून बाहेर पडावे ही विनंती करणार आहे. कारण सरकारमध्ये राहून मला हे करता येणार नाही याकरिता मला पूर्णवेळ बाहेर राहून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती मी पक्षश्रेष्ठींना पाठवणार आहे.

विदर्भातदेखील भाजपला कमी जागा

भाजपचा गड असलेल्या नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांचा 1 लाख 42 हजार 797 मतांनी पराभव केला. ठाकरे यांनी गडकरी यांनी कडवी झुंज दिल्याची चर्चा यानिमित्त व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी पराभवानंतरही मागील 2019 च्या तुलनेत काँग्रेसची मते वाढल्याचे आकडेवारीतून दिसून आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांच्या रुपात आव्हान उभे केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. त्यातच गडकरींना दगाफटका होतो की काय, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, शेवटी गडकरी यांनी नागपूरचा गड कायम राखला. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव करत विजयाची हॅट्रीक नोंदविली. काँग्रेसचा पराभव झाला असला तरी 2019 च्या तुलनेत काँग्रेसने 73 हजार 212 मते अधिक घेतली.

Web Title: Fadnavis big statement accepting responsibility for defeat lok sabha 2024 in maharashtra will request party leaders to quit government nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.