Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“साखर निर्यातबंदी उठवावी, येणाऱ्या उसाला एकरकमी चार…”; शेतकऱ्यांचे आमदार भोसलेंना निवेदन

सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडले असून याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, असे निवेदनात म्हटले अाहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2024 | 03:28 PM
“साखर निर्यातबंदी उठवावी, येणाऱ्या उसाला एकरकमी चार…”; शेतकऱ्यांचे आमदार भोसलेंना निवेदन
Follow Us
Close
Follow Us:

कराड: सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, कोणत्याही कारखान्याने उस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आपण यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस दराची कोंडी फोडावी. तसेच चालू हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला एकरकमी चार हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

साखर निर्यातबंदी उठवावी. साखरेचे भाव प्रतिकिलो चाळीस रुपये करावा. इथेनॉलसाठी उसाचा रस वापरण्यास परवानगी द्यावी, उसाचा एफआरपी बेस 8.30 टक्के पूर्वीप्रमाणे करण्यात यावा. यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात, पोपटराव जाधव, सुनील कोळी, उत्तम खबाले, बाबासो मोहिते, सागर कांबळे, शंभू पाटील उपस्थित होते.

लोकांना केंद्र सरकारचे सहा हजार, लाडक्या बहिणींचे दीड हजार, अर्ध्या तिकिटात एसटी, मोफत रेशन मिळत असल्याने यातच जनता गडबडून गेली आहे. शेतकरी हक्काचे, कष्टाचे, घामाचे दाम मागायचे विसरला आहे. शेतकऱ्याच्या ऊस, सोयाबीन, कापूस, कांदा, दुधाला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे. लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी बळीराजा शेतकरी संघटना कायम राहील, असे आवाहन या निवेदनाद्वारे बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

कारखानदार, शेतकरी अडचणीत
गेल्या दहा वर्षात ऊस दरासाठी कोणत्याही प्रकारचे तीव्र आंदोलन झाले नसल्याने ऊसाला वाढीव दर मिळालेल्या नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घरात न बसता आपल्या कामाचे दाम मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा. सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडले असून याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, असे निवेदनात म्हटले अाहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला स्वीकारले, याचा मला जास्ती आनंद झाला आहे. माझ्यावरील जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून जनतेने मला दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न राहील. कराड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जे लागेल ते आपण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ग्वाही दिली आहे. या मतदारसंघातील जनतेच्या सर्व मागण्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे,” असा विश्वास अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Maharashtra Election: कराड दक्षिणमध्ये ‘अतुल’पर्व; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला. याठिकाणी भाजपचे डॉ. अतुलबाबा भोसले यांना 1 लाख 39 हजार 505 मते मिळाली. तर विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मते मिळाली. यामध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचा 39 हजार 355 मतांनी विजयी झाला.

Web Title: Farmers demanr to mla dr atul bhosale for sugarkane rate four thousand rupees karad satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 03:28 PM

Topics:  

  • Dr Atul Bhosale

संबंधित बातम्या

‘सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला करणार’; नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा विश्वास
1

‘सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला करणार’; नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा विश्वास

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार…; भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची ग्वाही
2

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार…; भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.