काँग्रेसने दक्षिणच विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटील यांच्यासह फत्तेसिंह सरनोबत यांच्या नावांची दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय महायुतीच्या पक्षातील तिन्ही नेत्यांनी घेतला आहे. एखाद्या ठिकाणी महायुती म्हणून लढत झाली नाही.
भाजप साताऱ्यामध्ये नवीन उत्साह आहे. साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी पदभार स्वीकारला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शपथविधी सोहळ्यानंतर आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार त्यांच्या मतदारसंघाकडे परतत आहेत. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी देखील त्यांच्या मतदारसंघाला भेट दिली आहे.
पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, या लोकांना याच जागेवर घरे मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सोमवारी (दि.25) कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुष्प चक्र अर्पण करून अभिवादन केले.
Maharashtra Election 2024: सकाळी आठ वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, चव्हाण कुटुंबीयांनी ६० वर्षांत अनेक मंत्रिपदे भूषवताना कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यासाठी कोणतेही ठोस काम आणले नाही. याच भूमिकांमुळे सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.
२०१९ च्या अपयशाने खचून न जाता लोकसेवेचे काम सुरु केले. करोनाच्या लाटेत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले. सुरेशबाबांनी लोकांची अखंड सेवा केली, असे भाजप - महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल…
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडणुकीसाठी एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने…
जिल्हा बँक ही शिखर बँक आहे. याठिकाणी योग्य लोक निवडून जावेत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पक्ष विचारांच्या लोकांची बैठक घेण्यात येईल.
कराड : भाजपची सहकार क्षेत्रात ताकद वाढली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (दादा) यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. भाजपाला विश्वासात…