माजी खासदार प्रितिश नंदी यांचं निधन; शिवसेनेच्या पाठिंब्यावर बनले होते खासदार
पत्रकार, सिने निर्माते आणि माजी खासदार प्रितीश नंदी यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार बनले होते. त्यांनी पत्रकारितेत मोठे करियर केले होते. त्यासोबतच अनेक पुस्तकांचे लेखक तसेच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक पदही भूषविले होते.
कवी, लेखक, पत्रकार अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. प्रितीश नंदी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियातून अभिनेते अनुपम खेर यांनी दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट टाकत प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली
त्यांनी लिहिले, ‘माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक #PritishNandy च्या निधनाबद्दल जाणून खूप दुःख झाले आणि धक्का बसला! अप्रतिम कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक/पत्रकार! मुंबईतील माझ्या सुरुवातीच्या दिवसांत तो माझी सपोर्ट सिस्टीम आणि शक्तीचा मोठा स्रोत होता. आम्ही बऱ्याच गोष्टी सामायिक केल्या. मी भेटलेल्या सर्वात निर्भय लोकांपैकी तो एक होता. आयुष्यापेक्षा नेहमीच मोठे. मी त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो. उशिराने आमची फारशी भेट झाली नाही. पण एक काळ असा होता जेव्हा आपण अविभाज्य होतो! जेव्हा त्याने मला फिल्मफेअरच्या मुखपृष्ठावर आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे #TheIllustratedWeelky वर टाकून मला आश्चर्यचकित केले ते मी कधीही विसरणार नाही. यारांच्या यारची खरी व्याख्या होती! माझ्या मित्रा मला तुझी आणि आमची एकत्र आठवण येईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
2000 च्या दशकाच्या सुरुवातीस, प्रितीश नंदी यांनी प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स अंतर्गत सूर, कांते, झंकार बीट्स, चमेली, हजारों ख्वाइशें ऐसी, आणि प्यार के साइड इफेक्ट्स सारख्या उल्लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली. अलीकडेच त्यांच्या कंपनीने फोर मोअर शॉट्स प्लीज ही वेब सिरीज तयार केली आहे. आणि काव्यसंग्रह मालिका मॉडर्न लव्ह मुंबई. तत्कालीन संयुक्त शिवसेनेचे महाराष्ट्रातील माजी राज्यसभा सदस्य प्रितिश नंदी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मीडिया आणि टीव्ही व्यक्तिमत्त्व, चित्रपट निर्माता, प्राणी हक्क वकील आणि टीव्ही आणि स्ट्रीमिंग सामग्रीचे निर्माता म्हणून त्यांची ओळख होती.