Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण डोंबिवली गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, वाचा सुनावणीदरम्यान नेमकं काय झाल

गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकणावर उल्हासनगर कोर्टात सुनावणी झाली असून यावेळी पोलिसांनी गणपत गायकवाड यांची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 03, 2024 | 06:58 PM
Shiv Sena ministers meet Fadnavis in Ganpat Gaikwad firing case; Call for drastic action; Where exactly is the alliance?

Shiv Sena ministers meet Fadnavis in Ganpat Gaikwad firing case; Call for drastic action; Where exactly is the alliance?

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. पण, अवघ्या काही मिनिटांत गणपत गायकवाड यांना कोर्टातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उल्हासनगर कोर्टात सुनावणी

गोळीबारप्रकरणी उल्हासनगर कोर्टात सुनावणी घेण्यात आली. सुरुवातीला गणपत गायकवाड यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार असल्याचे सागंण्यात आले होते. पण, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता व्हीसीद्वारे हजर न करता प्रत्यक्षात गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. तसेच यावेळी पोलिसांनी गणपत गायकवाड यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडे मागण्यात आली आहे.

सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?
न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच, या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचादेखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असेही पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली, त्यानंतर कोर्टाने त्यांचा निकाल हा राखून ठेवला होता. पण, आता गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घटनेचं सीसीटीव्ही समोर

हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटांत आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तूल काढून गोळीबाराला सुरुवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या.

दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी

गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. मात्र, तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करीत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.

Web Title: Ganpat gaikwad remanded in police custody till february 14 in kalyan dombivli shooting case read what actually happened during the hearing nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2024 | 06:54 PM

Topics:  

  • MLA Ganpat Gaikwad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.