Goa Maze App Launched: गोवा फिरणं होणार सुपर इझी! 'या' अॅप'मुळे बसपासून रिक्षापर्यंत सर्व सेवा एका क्लिकवर

गोव्यात कदंब परिवहन महामंडळाच्या अधिकृत भागीदारीत 'माझे अॅप' सुरू करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना कदंब बस, पिंक रिक्षा आणि मोटारसायकल पायलट सेवा एकाच ठिकाणी बुक करता येणार आहेत. विशेष म्हणजे, 10 भाषांमध्ये आणि 24 तास बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल.
Goa Maze App Launched
Goa Maze App Launched (सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  1. गोव्यात 'माझे अॅप' लॉन्च.

  2. बस, पिंक रिक्षा आणि बाइक टॅक्सी बुकिंग एकाच अॅपवर.

  3. चालकांना 5 लाखांचा आरोग्य विमा आणि 10 लाखांचा मुदत विमा

Goa Transport News: कदंब महामंडळाने सरकारच्या माध्यमातून सुरू केलेलं 'माझे अॅप' राज्यातल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, असं मत महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यक्त केलं. कदंब परिवहन महामंडळाच्या अधिकृत भागीदारीत आणि दिव्यांग व्यक्तींसाठीच्या राज्य आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने तयार केलेल्या या अॅपचं उद्घाटन पणजीतील पाटो प्लाझा येथील हॉटेलमध्ये झालं.

• या अॅपवर काय-काय मिळणार?

1. 10 भाषांमध्ये बुकिंग - तुयेकर म्हणाले की, या अॅपवरून 10 भाषांमध्ये गाड्यांचं बुकिंग करता येईल.

2. तीन सेवा एकाच ठिकाणी - कदंब बसेस, पिंक रिक्षा आणि मोटारसायकल पायलट सेवा यात मिळतील.

3. 24 तास बुकिंग चालेल - बुकिंग 24 तासांसाठी चालू राहणार असून गाडी कुठे पोहोचलीय, याचं थेट लोकेशन पण समजेल.

4. किती बसेस - राज्यात 600 बसेस आहेत, त्यापैकी 150 ईव्ही बसेस आहेत.यावेळी व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, सरव्यवस्थापक महेंद्र पेडणेकर, गोवा मोटारसायकल टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम्युअल टिमोथी आणि सहसंस्थापक रिबेका लोबो उपस्थित होते. ग्रेसफुल गोएम सुपरॲप प्रा. लि. या गोव्यातल्या स्थानिक कंपनीने हे अॅप बनवलंय. यात बस, मोटारसायकल पायलट आणि रिक्षा सेवा एकाच ठिकाणी मिळतात.

• चालकांना काय फायदा होणार?

1. 5 लाखांचा आरोग्य विमा - पायलट आणि पिंक रिक्षा चालकांना 5 लाखांचा आरोग्य विमा मिळेल.

2. 10 लाखांचा मुदत विमा - सोबतच 10 लाखांचा मुदत विमा पण मिळेल.

3. पहिल्या 100 चालकांना फ्री - पहिल्या 100 चालकांना तो मोफत असून दरवर्षी त्याचं नूतनीकरण होईल. अॅपवर अॅक्टिव्ह असेपर्यंत हे संरक्षण कायम राहील.

Goa Maze App Launched
Western Railway Megablock : 36 तासांचा ब्लॉग अन् 162 लोकल रद्द, मुंबईकरांनो प्रवासापूर्वी वाचा वेळापत्रक

• पुढे अजून काय येणार?

1. अॅपवरून मिळतील या सुविधा - पुढच्या टप्प्यात अन्नपदार्थ, किराणा, औषधे, घरगुती सेवा, आरोग्यसेवा, विमान प्रवास, हॉटेल आणि खासगी यॉट बुकिंग पण मिळेल.

2. स्थानिकांना जोडणार - स्थानिक दुकाने व सेवा देणाऱ्यांना जोडण्यावर जास्त भर असेल.

Goa Maze App Launched
Western Railway Coaching Depot: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दादरमधून नव्या एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग मोकळा

• पायलट-प्रवासी नातं टिकवण्याचा प्रयत्न

सुरेश ठाकूर म्हणाले की, पायलट-प्रवासी नातं टिकवण्याचा प्रयत्न केला. पायलटांची संख्या कमी होत चाललीय, आणि बाहेरच्या राज्यातले तरुण गाड्या घेऊन येऊन डिलिव्हरीचं काम करतात. हे काम स्थानिक पायलटांना मिळावं, अशी मागणी त्यांनी केली.एकंदरीत, गोव्यात फिरायला आता एकच अॅप पुरेसं होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.