godvari express
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड, लासलगाव (Lasalgaon), निफाड व नाशिक येथील चाकरमानी व प्रवाशांची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस रेल्वे (Godavari Express) दोन वर्षांच्या कालखंडानंतर अखेर आजपासून सुरू झाली.
लासलगाव रेल्वे स्थानकात गोदावरी एक्स्प्रेस ((Godavari Express Update) आल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. लासलगाव येथे गोदावरी एक्स्प्रेस येताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य डिके जगताप यांनी सत्कार केला.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावमुळे मनमाड- कुर्ला टर्मिनस गोदावरी गोदावरी एक्स्प्रेस (Goadavari Express) बंद करण्यात आली होती. ती पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, गोदावरी एक्स्प्रेस तोट्यात असल्याचे कारण ती सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडून सतत नकार देण्यात आला होता.
[read_also content=”आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद गुजरात टायटन्सशी भिडणार https://www.navarashtra.com/sports/todays-ipl-match-will-play-between-sunrisers-hyderabad-and-gujarat-titans-nrps-267259.html”]
गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर प्रवाशांसह चाकरमान्यांचे होत असलेले हाल याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली. त्यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर गोदावरी एक्स्प्रेस मनमाड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मनमाड येथून नाशिकपर्यंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासह भाजप कार्यकत्यांनी प्रवासही केला.
नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे.