Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रॅण्ड स्लॅम विजेता रोहन बोपण्णाचे टेनिस प्रीमिअर लीगच्या सहाव्या हंगामात पदार्पण

टेनिस प्रिमियर लीगचा सहावा हंगाम आता अगदी जवळ आला आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू रोहन बोपण्णा या मालिकेत सहभागी होणार आहे. डिसेंबरमध्ये ही लीग मुंबईत पार पडणार आहे. बोपण्णा सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 14, 2024 | 01:15 AM
Grand Slam winner Rohan Bopanna debuts in the sixth season of the Tennis Premier League

Grand Slam winner Rohan Bopanna debuts in the sixth season of the Tennis Premier League

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टेनिसपटूंपैकी एक असलेला बोपण्णा प्रथमच टेनिस लीगमध्ये सहभागी होणार आहे. टेनिस खेळात क्रांती घडवून आणण्याचे लीगचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आतापर्यंत टेनिस प्रिमियर लीगचे पाच हंगाम यशस्वी पूर्ण झाले असून, सहाव्या पर्वाची तीव्रता वाढू लागली आहे. भारताचा ४४ वर्षीय बोपण्णाने कारकिर्दीत दोन ग्रॅण्ड स्लॅम विजेतीपदे  (२०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन  ओपन पुरुष दुहेरी आणि २०१७ मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी) मिळविली आहेत. तीन ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला चौथ्या स्थानावर समाधान

रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बंगळुरुचा रहिवासी असलेल्या बोपण्णाने वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारा सर्वात वयस्क खेळाडू म्हणून मान मिळविला होता. कारकिर्दीत आतापर्यंत त्याने २५ हून अधिक विजेतीपदे मिळविली आहेत. टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा बोपण्णा लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झानंतर चौथा टेनिसपटू आहे. या चारही भारतीय टेनिसपटूंनी कारकिर्दीत एकतरी ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे.

दोन दशकाहून अधिक काळ एटीपी मालिकेचा भाग

जवळपास दोन दशकाहून अधिक काळ एटीपी मालिकेचा भाग असलेला बोपण्णा आणि टेनिस प्रिमियर लीगच्या नव्या शैलीत खेळताना दिसणार आहे. सर्व फ्रॅंचाईजी उपांत्य फेरीत पात्र होण्यासाठी प्रत्येकी पाच सामने खेळणार आहेत. लीग क्रांतिकारक अशा २५ गुणांच्या पद्धतीत खेळविली जाणार आहे. दोन फ्रॅंचाईजींच्या सामन्यात पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी सामन्यांचा समावेश असेल. प्रत्येक सामन्यात १००० गुण असतील. प्रत्येक श्रेणीचे मूल्य २५ गुण असेल. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात ५०० गुण (१०० गुण बाय ५ सामने) गुण कमावता येणार आहेत. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

काय म्हणाला रोहन बोपण्णा पाहा

अत्यंत अनुभव गाठिशी असलेला बोपण्णा, सुमित नागल, फ्रान्सचा ह्युगो गॅस्टन, अर्मेनियाचा एलिना अवनेसियान या प्रमुख खेळाडूंसह विजेतेपदासाठी प्रयत्ननशील राहिल. लीगचे सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) कोर्टवर होणार आहेत. टेनिस प्रिमियर लीगचा एक भाग होताना मला खूप आनंद झाला आहे. मी खूप रोमांचित आहे. विशेषतः लीगच्या नावीन्यपूर्ण २५ गुणाच्या पद्धतीसह ही लीग तरुण खेळाडूंना आकर्षित करेल, असा मला विश्वास वाटतो, असे रोहन बोपण्णाने सांगितले.

रोहन बोपण्णाची उपस्थिती प्रेरणादायी

या प्रसंगी बोलताना टेनिस प्रिमियर लीगचे सहसंस्थापक कुणाल ठाकूर म्हणाले, आमच्यासोबत अतिशय गतीमान आणि अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णा सोबत असणे खूप आनंददायी आहे. त्याची क्षमता आणि कारकिर्द अशी आहे की त्याची आम्हाला वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्याची उपस्थिती केवळ लीगच्या सहाव्या हंगामाला नाही, तर अवघ्या टेनिस विश्वालाही प्रेरित करेल.

रोहन बोपण्णा हा टेनिस विश्वातील एक प्रमुख खेळाडू आहे. लीगच्या सहाव्या पर्वात खेळण्यास बोपण्णा तयार झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यामुळे मुंबईसह टेनिस विश्वातही त्याची चर्चा होईल. बोपण्णासह अन्य प्रमुख खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत, असे टेनिस प्रिमियर लीगच्या सह संस्थापक मृणाल जैन यानी सांगितले.

Web Title: Grand slam winner rohan bopanna debuts in the sixth season of the tennis premier league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 01:15 AM

Topics:  

  • Rohan Bopanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.