Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक – हरविंदर सिंह रिंदानं स्लीपर सेलच्या मदतीनं नांदेडमध्ये पाठवलं आरडीएक्स, बॉम्बस्फोटाचा प्लॅन

हरविंदर सिंह रिंदा (Harvinder Singh Rinda) यानं स्लीपर सेलच्या मदतीनं आरडीएक्स (RDX) पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साधारण ५ ते ६ महिन्यांपूर्वी मुंबईला इनपुट मिळालं होतं. त्यानुसार, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट (Bomb blast) घडवून आणले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अलर्ट हरविंदर सिंह रिंदा याच्यासंदर्भातच होता.

  • By साधना
Updated On: May 07, 2022 | 02:58 PM
terrorist caught in haryana

terrorist caught in haryana

Follow Us
Close
Follow Us:

खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) हरविंदर सिंह रिंदानंच (Harvinder Singh Rinda) नांदेडमध्ये (Nanded) आरडीएक्स (RDX) पाठवलं असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. हरविंदर सिंह रिंदा यानं स्लीपर सेलच्या मदतीनं आरडीएक्स पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या हवाल्यानं आलेल्या माहितीमुळे या गोष्टीची माहिती महाराष्ट्र एटीसला (Maharashtra ATS) नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

[read_also content=”नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत आग – सहा कंपन्या जळून खाक, एकाचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/fire-in-pavne-midc-of-navi-mumbai-six-companies-affected-nrsr-277147.html”]

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ५ ते ६ महिन्यांपूर्वी मुंबईला इनपुट मिळालं होतं. त्यानुसार, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अलर्ट हरविंदर सिंह रिंदा याच्यासंदर्भातच होता. त्यामुळे नांदेडमध्ये सापडलेलं आरडीएक्स हे मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स नांदेडमध्ये आलं, पण याबाबत महाराष्ट्र एटीएसकडे यासंदर्भात कोणतीच माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच नांदेडमधील लोकांकडून जवळपास २०० कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. सध्या रिंदा पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा जिल्ह्यातून ४ दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दहशतवाद्यांच्या पूर्वीच्या आरडीएक्सच्या खेपेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कथित मानवी स्फोटामागे हरविंदर सिंह रिंदाचाच हात असल्याचं लुधियाना येथील न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे, त्यादरम्यान रिंदानं स्फोटापूर्वी संशयितांशी चार संभाषणं केली असल्याचंही समोर आलं आहे.

दरम्यान, हरियाणात अटक करण्यात आलेल्या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंग रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. नांदेड पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार, संशयितांच्या घरी झडतीची मोहीम राबवली जात आहे. काल हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक केली होती. यावेळी चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता. नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Harvinder singh rinda provided rdx to nanded by sleeper cell planning for bombblast nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2022 | 02:56 PM

Topics:  

  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला
1

मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला

ऐकावं ते नवलचं! मुलाने सावत्र आईसोबत पळून जाऊन केलं लग्न, वडील म्हणाले “माझ्या सर्व इच्छा अपूर्ण…”
2

ऐकावं ते नवलचं! मुलाने सावत्र आईसोबत पळून जाऊन केलं लग्न, वडील म्हणाले “माझ्या सर्व इच्छा अपूर्ण…”

सासऱ्यांना दिल्या झोपेच्या गोळ्या अन् मुलासमोरच केला सुनेवर बलात्कार, दुपट्ट्याने तिचा गळा दाबला, नंतर…
3

सासऱ्यांना दिल्या झोपेच्या गोळ्या अन् मुलासमोरच केला सुनेवर बलात्कार, दुपट्ट्याने तिचा गळा दाबला, नंतर…

झाडांना पाणी घालताना 14 व्या मजल्यावरून खाली पडून शरीराचे दोन तुकडे, भयावह मृत्यू; हरयाणातील धक्कादायक प्रकार
4

झाडांना पाणी घालताना 14 व्या मजल्यावरून खाली पडून शरीराचे दोन तुकडे, भयावह मृत्यू; हरयाणातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.