मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे कोल्हापुरच्या कागलचे समरजीत घाटगे यांनी शरद पवार याच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यासाठी कागलमध्ये खुद्द शरद पवार यांनी मोठी सभाही घेतली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगे निवडून आल्यास त्यांना मंत्रीपदाची संधी देण्याचे आश्वासनही दिले. या आश्वासनानंतर आता कागलचे अजित पवार यांच्या गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता थेट समरजीत घाटगे यांना आव्हान दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफांनी समरजीत घाटगेंना खुले आव्हान दिले आहे.
लोकशाहीमध्ये 25 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवण्यास पात्र होते. पण आता तर सात पक्ष आहेत. त्यामुळे उमेदवारांची मांदियाळीच रंगली आहे. पण शरद पवार हे माझे दैवत आहेत.पवार साहेब माझ्या मागे का लागले आहेत, हे मला माहिती नाही. माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागलेत हे कळत नाही.असा सवाल त्यांनी विचारला आहे.
हेदेखील वाचा: समरजीत घाटगेंना मिळणार मोठी संधी;शरद पवार काय म्हणाले
त्याचवेळी त्यांनी समरजीत घाटगेंवरही निशाणा साधला आहे. माझ्या मागील सहा निवडणुकांमध्ये शरद पवार आले होते ते नेहमी म्हणायचे की, राजा विरोधात प्रजा जिंकली पाहिजे, हेच मी आजही म्हणत आहे. पण, निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी खैर नही, असे म्हणत त्यांनी थेट समरजीत घाटगेंना आव्हान दिले आहे.
ही निवडणूक ‘नायक विरूद्ध खलनायक’ अशी आहे. पण जयंत पाटील असे बोलू शकणार नाहीत. ते बोललेही नाहीत .पण यामागे कोणती माणसे होती. तेही पाहायला पाहिजे. जिथे जागा रिक्त आहेत तिकडे जाताना दिसत आहेत. गेल्या वेळीही असा प्रयत्न झाला पण मेहूणे पाहुणे समजवण्या पलीकडची टीका त्यांनी केली आहे. पण त्यासाठी निवडून यावं लागतं आणि बहुमत लागतं, असा टोला देखील मुश्रीफांनी लगावला आहे.
हेदेखील वाचा: पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव कारने महिलेला इतकं फरफटतं नेलं की…, मालाडमध्ये नेमकं काय