File Photo : Accident
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मालाड परिसरात फोर्ड कारचालकाने एका 27 वर्षीय तरूणीला जोरदार धडक दिली. या घटनेत तरूणी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जात होतं, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार चालकला बेदम मारहाण केली. मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. महिलेच्या पश्च्यात पती आणि दोन लहान मुली आहेत.
हेदेखील वाचा- राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणात सर्वगोड माफी केव्हा मागणार? ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल
शहाना काझी असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणीचं नाव आहे. ती रात्री मेहंदी क्लास संपवून पायी घरी जात होती. मात्र यावेळी मागून येणाऱ्या एका भरधाव फोर्ड कारने तिला जोरदार धडक दिली आणि तिला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं. हा अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात तरूणी गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात नेले असताना तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने कार चालकाला बेदम मारहाण केली. पुन्हा एकदा एका निष्पाप व्यक्तिचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पुन्हा एकदा एका महागड्या गाडीच्या धडकेत सामान्य माणसाचा बळी गेला आहे.
मालाड परिसरातील भर वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. महिलेला धडक दिल्यानंतरही आरोपीनं गाडी थांबवली नाही. त्यानं महिलेला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर संतप्त जमावाने फोर्ड कारचालकाला घेरलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय जमावाने गाडीची देखील तोडफोड केली. जमावाच्या मारहाणीत कार चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोर्ड कारचालक मर्चंट नेव्हीमध्ये सेवेला आहे. चालक मद्यपान करून कार चालवत होता का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हेदेखील वाचा- धक्कादायक! मशीनच्या बेल्टमध्ये अडकून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; अंबरनाथमधील घटना
यासाठी मालाड पोलिसांनी चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर निष्पाप तरूणीला चिरडणाऱ्या कार चालकाने मद्यपान केलं होतं की नाही, हे स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांच म्हणण आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या अपघाताबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासर, मुंबईतील मालाड परिसरात मंगळवारी रात्री फोर्ड कारने एका 27 वर्षीय तरूणीला जोरदार धडक दिली आणि तिला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं. या भीषण अपघातानंतर कार चालकाने तरूणीला रुग्णालयात दाखल केलं , मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर चालकाने मद्यपान केलं होतं की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम २८१, २८५, १०५ आणि १८४, १८५ एमव्हीए अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच वरळी हिट अँड रन अपघातामुळे संपूर्ण मुंबईत खबबळ उडाली होती. चालकाने महागड्या कारनं एका महिलेला फरफटत नेलं होतं, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका आलिशान कारच्या धडकेत निष्पाप महिलेने तिचा जीव गनावला आहे.