Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’; जळगाव जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले

धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2024 | 12:04 PM
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; 17 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; 17 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार होताना दिसत आहे. त्यातच जळगावात मुसळधार पाऊस झाला आहे. शहरासह जिल्हाभरात पावसाचे अधुनमधून झोडपणे सुरूच आहे. यामुळे शेतकरी आणि शेतीनिर्भर घटकामध्धाये भीतीचे वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. श्रावणसरींमुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्प भरले असून, शेती कामांना ब्रेक लागला आहे.

हेदेखील वाचा : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत

शहरासह जिल्हाभरात श्रावणसरी कोसळत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक फटका शेतकरी आणि शेतीनिर्भर घटकाला बसत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील शेतशिवारात पाण्याचा संचय झालेला आहे. यामुळे पीके धोक्यात आली आहेत. एकतर मजुरांची टंचाई त्यात मजूर मिळालेच तर पाऊस सुरू झाला तर काम अर्ध्यावर सोडून मजुरांना घरची वाट धरावी लागते. त्यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. यामुळे पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त दिसून येत आहे. पावसाने आता उसंत घ्यावी, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. शहरी भागात अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

साथीच्या रोगांमध्ये होतीये वाढ

साथरोगांचा विळखा शहरांसह ग्रामीण भागालाही होत आहे. आजारपण वाढत असल्याने डॉक्टरांकडे गर्दी दिसून येत आहे. निमोनिया, मलेरिया, डेंग्यूच्या रूग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मलेरिया विभागाकडून घरोघरी सर्व्हे केला जात आहे. अनेक मोकळ्या जागांवर दलदल झाल्याने डास, मच्छरांसह इतर आजारांच्या कीटकांची उत्पत्ती वाढली आहे.

अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’

या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील अमरावतीत पावसाचा ‘रेड अलर्ट’

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावतीत ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे आज अतिवृष्टीसदृश्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, जळगाव आणि सांभाजीनगर येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : गुजरातमध्ये पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू तर 17,800 जणांना सुरक्षितस्थळी हलवले

Web Title: Heavy rain warning in districts of konkan and marathwada and also vidarbha today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे
1

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
2

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत
3

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

India Rain Alert: आज ‘या’ राज्यांत पाऊस घालणार धुमाकूळ; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
4

India Rain Alert: आज ‘या’ राज्यांत पाऊस घालणार धुमाकूळ; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.