मुंबई – मुसळधार पावसामुळं गुरुवारीची पहाट महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी व दु:ख देणारी होती. राज्यातील काही भागात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस (State Rain) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. यामध्ये 16 जणांना जीव गमवावा लागला, तर 100 जणांचे प्राण वाचवले आहेत. कोकणात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून 100 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत 16 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. तर अजूनही शोधकार्य सुरु आहे. काल सांयकाळी अंधूक प्रकाश व पावसामुळं बचावकार्य थांबवले, पण आज पुन्हा सकाळपासून सुरु केले आहे. दरम्यान, आजही या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाकडून (IMD) रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर येथे मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक संस्था, मंडळे, ट्रस्ट हे मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यानंतर आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गणेश मंडळ लालबागचा राजा हे मंडळ देखील आज खालापूर येथे दाखल होणार आहे.
आज लालबागच्या राजा गणेश मंडळाकडून ग्रामस्थांना मदत
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गणेश मंडळ लालबागचा राजा हे मंडळ आता ईर्शाळवाडीवर जखमींच्या, ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. ईर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीतहानी झाली आहे. तसेच अनेक जखमींवर उपचार देखील सुरु आहेत. या भीषण दुर्घटनेत जखमी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आज मोठी मदत घेऊन निघणार आहेत. दोन मोठे टेम्पोमधून ही मदत पोहचवली जाणार आहे. ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ तसेच विविध अन्नपदार्थ , ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून ईर्शाळवाडीकडे रवाना होणार आहे.
अनेक संस्था, मंडळे यांचा मदतीचा हात, आज लालबागचा राजाकडून मदत
दरम्यान, या दुर्घटनेनंतर अनेक संस्था, मंडळे यांनी मदतीचा हात पुढे केले आहे. तर आज लालबागचा राजा हे प्रसिद्ध मंडळ तिथे जाणार आहे. ईर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीत हानी झाली आहे. तसेच अनेक जख्मींवर उपचार देखील सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेत जख्मी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आज मोठी मदत घेऊन निघणार आहेत. दोन मोठे टेम्पो मधून ही मदत पोहचवली जाणार आहे.
इर्शाळवाडीमध्ये आजही शोधमोहीम सुरू
खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 100 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. गुरूवारी संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या बचावकार्यात अडथळे येत होते, त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे.