कल्याण : कल्याण एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन सत्तेवर शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच, काही ठिकाणी तर आमना-सामनाही झाला. मात्र, कल्याणमध्ये आज वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. कल्याण पारनाका सुशोभिकरणाच्या कार्यक्रमात शिंदे आणि ठाकरे गट एकत्रित आल्याने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिंदे गटाचे आमदारांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे कार्यकर्ते
कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसर सुशोभिकरणाकरिता शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ आज आमदार भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे ही काही पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी झाले होते. या घटनेमुळे एकच आश्चर्य व्यक्त केले. खुद्द आमदार भोईर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, राजकारणासाठी गट-तट झाले. मात्र, गटातटाला कल्याणमध्ये थारा नाही. आता एक आहोत. पुढेही एकत्र राहणार. हे सामाजिक काम आहे.
कल्याणमध्ये गटातटाच्या राजकारणाला थारा नाही
राजकारणाचा सामाजिक वारसा ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालवावा, असे स्पष्ट केले आहे. आमदारांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाने एकत्रित येणे. तसेच आमदारांनीसुद्धा आम्ही एकत्रित आहोत. कल्याणमध्ये गटातटाच्या राजकारणाला थारा नाही, असे म्हणणे हे आगामी निवडणुकांपर्यंत कायम राहणार की नाही हे पाहणे आत्ता महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Title: Hey surprise in kalyan constituency shiv sena shinde and thackeray factions came together sparking discussion everywhere nryb