Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण- कोर्टाने फेटाळली लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची दोषमुक्तीची याचिका, नोंदवले ‘हे’ महत्त्वाचे निरीक्षण

मालेगाव प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) २८८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून पुरोहित, कुलकर्णी आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी खटला सुरू होण्यापूर्वीच प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, (एनआयए) विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

  • By साधना
Updated On: Jan 02, 2023 | 02:04 PM
prasad purohit

prasad purohit

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मालेगाव २००८ बॉम्बस्फोटांशी (Malegaon Bomb Blast Case) संबंधित खटल्यातील मुख्य आरोपींपैकी एक आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित (Lt. Col. Prasad Purohit) याच्या दोषमुक्तीची याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटात पुरोहित यांचा सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच बैठकीला उपस्थित असताना पुरोहित सरकारी कर्तव्य बजावत नव्हते. त्यामुळे आरोपीविरोधात खटला भरण्यापूर्वी केंद्र सरकारची पूर्वसंमती मिळवणे गरजेचे नाही, असे निरीक्षण नोंदवत न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने पुरोहित यांची याचिका फेटाळून लावली.

[read_also content=”तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नव्या नावाची एन्ट्री, संजीव कौशल आहेत तरी कोण? https://www.navarashtra.com/movies/sanjeev-sanyals-name-taken-in-tunisha-sharma-suicide-case-nrsr-358627.html”]

मालेगाव प्रकरणी २८८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून पुरोहित, कुलकर्णी आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी खटला सुरू होण्यापूर्वीच प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, (एनआयए) विशेष न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर विशेष न्यायालयात खटल्याला सुरुवात झाली. आरोपींनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत चुकीच्या पद्धतीने आपल्यावर कारवाई केल्याचा दावा आरोपीं केला तसेच प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. कालांतराने आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी केलेली याचिका मागे घेतली होती.

मात्र, पुरोहित यांनी याचिका मागे घेण्यास नकार दिला होता. तसेच विशेष एनआयए न्यायालयाने खटला भरण्यासाठी तपास संस्थांनी कायद्यानुसार आवश्यक पूर्वसंमतीच घेतलेली नाही. त्यामुळे खटला रद्द करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. १ डिसेंबर २०२२ रोजी या याचिकेवरील राखून ठेवलेला निर्णय सोमवारी जाहीर केला.

Web Title: High court rejects plea filed by lt col prasad purohit in malegaon blast case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 02:02 PM

Topics:  

  • Malegaon Bomb Blast Case

संबंधित बातम्या

Malegaon Blast Case Verdict:  १७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटात नवा ट्विस्ट! कोण करतोय मोठे खुलासे?
1

Malegaon Blast Case Verdict: १७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटात नवा ट्विस्ट! कोण करतोय मोठे खुलासे?

मालेगाव बॉम्बस्फोटात नवा ट्वीस्ट! RSS च्या मोहन भागवतांना अडकवण्याचा होता प्लॅन, ATS अधिकाऱ्याचा दावा
2

मालेगाव बॉम्बस्फोटात नवा ट्वीस्ट! RSS च्या मोहन भागवतांना अडकवण्याचा होता प्लॅन, ATS अधिकाऱ्याचा दावा

सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?
3

सैन्यातले सहकारी ब्रिगेडियर बनले, कर्नल पुरोहित यांचं काय? सैन्यात बढती मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.