Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसाठी आता 10 मिनिटं मिळणार वाढीव

परिक्षेबाबत विद्यार्थीहिताची मोठी अपडेट समोर आहे. यापुढे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वाढीव 10 मिनिटे देण्यात येणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 24, 2024 | 07:29 PM
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसाठी आता 10 मिनिटं मिळणार वाढीव
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दहावी (10th Exam) बारावी (12th Exam) बोर्डच्या परिक्षा येत्या मार्च एप्रिल (SSC March 2024) महिन्यामध्ये सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरुपामध्ये हॉलतिकीट (SSC Exam Hall ticket) डाऊनलोड देखील करता येत आहे. याच परिक्षेबाबत विद्यार्थीहिताची मोठी अपडेट समोर (board exam time table) आहे. यापुढे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वाढीव 10 मिनिटे देण्यात येणार आहे.

बोर्ड परिक्षेमध्ये मोबाईच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढणे, ते विकणे किंवा व्हायरल करणे यांसारखे गैरप्रकार वाढले होते. पेपरफुटी प्रकारामुळे परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. आता मात्र पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्य हिताचा विचार करुन वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिक्षेच्या वेळीआधी 10 मिनिटे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी मिळावे अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात होती. त्यामुळे निर्णयाचा पुर्नविचार करुन बोर्डाने हा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांची वेळी सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास सुरुवात होईल. सकाळ सत्रात सकाळी 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रामधील 11 ते 2.10, 11 ते 1.10, 11 ते 1.40 अशी वेळ असणार आहे. तर दुपारच्या सत्रातील 3 ते 6.10, 3 ते 5.10, 3 ते 5.40 अशा प्रकारे सर्व पेपरसाठी वेळ 10 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.

Web Title: Hsc and ssc exam 2024 students of class 10th and 12th will now get 10 minutes extra for the exam nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2024 | 07:29 PM

Topics:  

  • SSC Exam Hall Ticket

संबंधित बातम्या

दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी
1

दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.