वर्धा : वर्ध्यात भुगाव नजीकच्या उत्तम गालवा कंपनीसमोर असलेल्या हॉटेलच्या चाळीमध्ये पतीने संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात पती आणि पत्नीचे भांडण झाले ते विकोपाला गेले. संतापानं पेटलेल्या पतीनं भुगाव पत्नीच्या डोक्यात बॅटने वार करत, डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. (Husbands killed his wife with Striking the bat) पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मूळचे पुलगाव येथील असणारे कैकशा आणि इम्रान हे दोघे गेल्या काही वर्षांपासून भुगाव येथील उत्तम कंपनीसमोर आपला भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करीत होते. तर इम्रान हा ट्रक ड्रायव्हर होता. कैकशा ही आईसोबत घरी राहत होती. दरम्यान त्यांच्यामध्ये दररोज यांच्यात वाद होत होता. संशयाच्या कारणावरून मंगळवारी देखील पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. पतीने बॅटने पत्नीच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर दगडाने देखील वार केले. यात कैकशा इम्रान खान हीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी इम्रान याला अटक करण्यात आली आहे.
[read_also content=”मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर https://www.navarashtra.com/maharashtra/minister-dhananjay-munde-suffers-heart-attack-condition-stable-nrps-268244.html”]
[read_also content=”बेदरकार चालकानं चौघांना उडवलं ; दोन बँक अधिकाऱ्यांसह पादचारी जखमी, पोलिसाचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/the-careless-driver-blew-up-four-pedestrian-injured-along-with-two-bank-officers-police-died-nrps-268241.html”]