वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले या गावी अनोख्या पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा केला जातो. गेल्या २५ वर्षांपासून चक्क 20 फूट खोल असलेल्या तलावात मध्यभागी देवीची स्थापना केली जाते.
शहरात नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली असून, आई जगदंबेचे आगमन अत्यंत थाटामाटात आणि भक्तिभावाने करण्यात आले. विशेषतः श्रीराम दरबार चौक येथील माताराणीचे आगमन सांस्कृतिक परंपरा जपत, मोठ्या उत्साहात पार पडलं.
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्रने 24 तासांचा राज्यव्यापी सेवाबंद आंदोलन पुकारले आहे.महाराष्ट्र शासन व मेडिकल कौन्सिलकडून BHMS-CCMP डॉक्टरांना एलोपॅथिक रजिस्टरमध्ये नोंदणी देण्याच्या अधिसूचनेचा IMA निषेध करत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा आज शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे.
खराब सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर कृषी विभाग येथे धडक जिल्ह्यात संततधार पावसामुळे तसेच सोयाबीन वर आलेल्या यलो मोझॅक आणि चारकोल रॉट या रोगांमुळे पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे.
Ice Ball Video : वर्धा जिल्ह्यातील हमदापूर येथे बुधवारी बर्फाचा एक भलामोठा तुकडा आढळला ज्याला पाहून सर्वच थक्क झाले. 5 किलोची ही गार पाहण्यासाठी संपूर्ण गाव जमा झालं. इंटरनेटवरही याचा…
महाराष्ट्र शासनाने आणलेल्या विशेष जन सुरक्षा अधिनियमाच्या विरोधात येत्या वर्ध्यातील जमनालाल बजाज पुतळा चौक, वर्धा येथे महाविकास आघाडी व जनसंघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. कायदा लोकशाही…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे.
परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. कटरने हातावर घाव मारत यात परिचारिकेला गंभीर स्वरूपात जखमी केलंय आणि आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला होता.
र्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.
१२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बजाज चौक उड्डाणपुलाचं काम पूर्णत्वास आल्यानंतर, खासदार अमर काळे यांनी या पुलाचं उद्घाटन कोणत्याही राजकीय नेत्याने करू नये, अशी भूमिका घेतली आहे.
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केली. जमिनीच्या वादातून हि हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
वर्ध्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात 22 कामगार जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार 750 कोटींची गुंतवणूक एमआयडीसीमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल 15000 रोजगार निर्मिती होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, अमरावती येथील पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा मोदींच्या…