Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election 2026: ‘दादांच्या निधनामुळे प्रचारापासून दूर राहिलो’; मुरलीधर मोहोळ यांची भावूक प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून जबाबदारी असूनही, मोहोळ यांनी एकाही प्रचाराला हजेरी लावली नाही. "दादा गेल्यानंतर आम्हाला राजकारणात रस राहिला नव्हता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2026 | 02:55 PM
Pune ZP Election 2026: ‘दादांच्या निधनामुळे प्रचारापासून दूर राहिलो’; मुरलीधर मोहोळ यांची भावूक प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुका येत-जात राहतील, पण या दुःखद काळात प्रचार करणे आम्हाला योग्य वाटले नाही- मुरलीधर मोहोळ
  • अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत मोहोळ यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले
  • आता नवीन व्यवस्था आल्याने पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधा यावर आमचा विशेष भर असेल
Pune ZP Election 2026: “अजितदादांच्या जाण्याने आमच्या मनात मोठे दुःख आहे. निवडणुका येत-जात राहतील, पण या दुःखद काळात प्रचार करणे आम्हाला योग्य वाटले नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राज्यात पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिली. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

पुणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून जबाबदारी असूनही, मोहोळ यांनी एकाही प्रचाराला हजेरी लावली नाही. “दादा गेल्यानंतर आम्हाला राजकारणात रस राहिला नव्हता. दादा स्वतः या निवडणुकीत ३५ ते ४० सभा घेणार होते,” असेही त्यांनी नमूद केले. पण “मतदार सुज्ञ आहेत, त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आहे, पुढे जे होईल ते पाहिले जाईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

Sangli Election 2026: देवर्डे येथे EVM बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक

अजित पवार विमान अपघाताच्या उपस्थित होणाऱ्या शंका कुशंकांबाबत बोलताना म्हणाले की,” अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत मोहोळ यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून ‘एआयबी’ (AIB) आणि ‘डीजीसीए’ (DGCA) या यंत्रणा काम करत आहेत. डेटा डाऊनलोड केला जात असून लवकरच तांत्रिक अहवाल समोर येईल.

तसेच, “इतका मोठा नेता गेला आहे, हे राज्याचे नुकसान आहे. यावर कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणात लक्ष घालून केंद्राकडे चौकशीची मागणी करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले ‘हे’ मोठे आश्वासन; आता शहरवासियांना दररोज…

पुणे महापालिकेच्या नवीन व्यवस्थेबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, “गेल्या तीन-चार वर्षांपासून शहराला प्रतिनिधी नव्हते. आता नवीन व्यवस्था आल्याने पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधा यावर आमचा विशेष भर असेल. पुण्याला देशातील सर्वात चांगले शहर बनवण्याचा आमचा संकल्प असून आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शरद बुट्टे पाटील यांना झालेल्या मारहाणीची माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ, असे असंही त्यांनी सांगितलं. तर पुणे- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी अत्यंत भयानक होती, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

Web Title: I stayed away from campaigning due to my grandfathers death muralidhar mohols emotional reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.