Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोठवलेले अधिकार तातडीने पूर्ववत करा’; नगराध्यक्ष दिलीप बगाडे आक्रमक

नगराध्यक्ष हे शहरातील लोकप्रतिनिधी असून नागरिकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला कामकाजात प्रभावीपणे निर्णय घेण्याचे अधिकार असणे आवश्यक आहे. अधिकार गोठविल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयावरही परिणाम होतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2026 | 07:56 AM
'गोठवलेले अधिकार तातडीने पूर्ववत करा'; नगराध्यक्ष दिलीप बगाडे आक्रमक

'गोठवलेले अधिकार तातडीने पूर्ववत करा'; नगराध्यक्ष दिलीप बगाडे आक्रमक

Follow Us
Follow Us:

वाई : नगराध्यक्षांचे प्रशासकीय व आर्थिक अधिकार गोठवल्याने पाचगणी शहरातील विविध विकासकामांवर परिणाम होत असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीलाही विलंब होत असल्याचा आरोप नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी केला आहे. नगराध्यक्षांना कायद्याने प्राप्त असलेले अधिकार प्रशासनाने तातडीने पूर्ववत करावेत, अशी मागणी करत बगाडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पाचगणी हे पर्यटननगरी म्हणून राज्यभर परिचित असून, शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, पर्यटन सुविधा तसेच नागरिकांशी संबंधित विविध विकासकामे सातत्याने मार्गी लावणे आवश्यक आहे. मात्र, नगराध्यक्षांचे अधिकार मर्यादित झाल्यामुळे निर्णय प्रक्रियेला अडथळे निर्माण होत असून, त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होत असल्याचे बगाडे यांनी म्हटले आहे.

नगराध्यक्ष हे शहरातील लोकप्रतिनिधी असून नागरिकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला कामकाजात प्रभावीपणे निर्णय घेण्याचे अधिकार असणे आवश्यक आहे. अधिकार गोठविल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयावरही परिणाम होतो. परिणामी विकासकामांना मंजुरी, प्रशासकीय कार्यवाही आणि विविध नागरी सुविधांशी संबंधित निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, असे बगाडे यांनी स्पष्ट केले.

शहरातील नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या

शहरातील नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. पाचगणीच्या पर्यटनविकासाबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक असताना नगराध्यक्षांचे अधिकार गोठविणे योग्य नाही, अशी भूमिका बगाडे यांनी मांडली.

नगराध्यक्षांचे अधिकार पूर्ववत करावेत

“नगराध्यक्षांना दिलेले अधिकार हे केवळ पदापुरते मर्यादित नसून शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी ते आवश्यक आहेत. अधिकारांअभावी विकासकामे आणि नागरिकांची कामे रखडत असतील, तर त्याचा फटका थेट पाचगणीकरांना बसतो. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नगराध्यक्षांचे अधिकार पूर्ववत करावेत,” अशी मागणी बगाडे यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रश्नावर प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि नगराध्यक्षांचे अधिकार पूर्ववत करण्याबाबत कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे पाचगणीकरांचे लक्ष लागले आहे. शहरातील विकासकामांना प्रशासकीय अडथळ्यांमुळे विलंब होऊ नये आणि लोकप्रतिनिधींना प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Web Title: Immediately restore frozen powers panchgani council president dilip bagade takes a firm stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 07:54 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.