Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वायसीएमबाबत रुग्णांच्या वाढलेल्या तक्रारी शोभणाऱ्या नाहीत; आमदार लक्ष्मण जगतापांनी आयुक्तांना केली “ही” सूचना

रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या मुलभूत सुविधा, दर्जेदार वैद्यकीय उपचार, सर्व आजारांवरील औषधे, आवश्यक डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2022 | 04:27 PM
वायसीएमबाबत रुग्णांच्या वाढलेल्या तक्रारी शोभणाऱ्या नाहीत; आमदार लक्ष्मण जगतापांनी आयुक्तांना केली “ही” सूचना
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सोई-सुविधा आणि वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढत आहेत. ही बाब श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शोभनीय नाही. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या मुलभूत सुविधा, दर्जेदार वैद्यकीय उपचार, सर्व आजारांवरील औषधे, आवश्यक डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय शहरातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाचे रुग्णालय आहे. त्याचप्रमाणे शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना सुद्धा याच रुग्णालयाचा मोठा आधार मिळत आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाबाबत रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यासाठी या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधा तसेच अपुरे मनुष्यबळ कारणीभूत ठरत आहे.

रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लागणारे वैद्यकीय साहित्य तसेच आधुनिक वैद्यकयी साधने उपलब्ध नाहीत. रुग्णांवर रात्रीच्या वेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला वेगवेगळ्या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यावर प्रत्यक्ष उपचारासाठी दोन ते तीन तासाचा अवधी लागत आहे. नवीन केस पेपर, औषधे घेणे, वैद्यकीय बिले भरण्यासाठी रुग्ण संख्येच्या तुलनेत काऊंटर अपुरे पडत आहेत. रुग्णांना हेल्थ कार्ड वाटप बंद करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया विभागातील अपुऱ्या सुविधा व कर्मचाऱ्यामुळे गोरगरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. अतिदक्षता विभागात दाखल होण्यासाठी रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त होत आहेत. या रुग्णालयाबाबत त्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

[read_also content=”राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन https://www.navarashtra.com/maharashtra/organized-various-programs-on-the-occasion-of-rajarambapu-patils-birth-anniversary-nrdm-310176.html”]

ही बाब पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शोभनीय नाही. महापालिकेमार्फत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तेथे गोरगरीब रुग्णांना अपुऱ्या सुविधा आणि नाहक मनःस्ताप सहन करावा लागत असेल, तर महापालिका प्रशासनाने निश्चितच त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयात चांगल्या मुलभूत सुविधा, वैद्यकीय सेवा, आवश्यक डॉक्टर्स व कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करुन रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा दर्जेदार करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

Web Title: Increased patient complaints about ycm are not appropriate mla laxman jagtap made this suggestion to the commissioner nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2022 | 04:27 PM

Topics:  

  • Rajesh Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.