Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेवर मोठा परिणाम

हवाई दलाच्या एका विमानाचा अपघात पुणे विमानतळावर झाला. या अपघातामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती बंद केली गेली. धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2026 | 07:47 AM
मोठी बातमी ! पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेवर मोठा परिणाम

मोठी बातमी ! पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; विमानसेवेवर मोठा परिणाम

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. विमानाचा अपघात झाल्याने पुणे विमानतळाची धावपट्टी पुढील काही तासांसाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम झाला. दरम्यान, हा एक किरकोळ स्वरुपाचा अपघात असल्याची माहिती दिली जात आहे. यामध्ये विमान कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, अशी माहिती दिली जात आहे.

याबाबत भारतीय हवाई दलाने महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हवाई दलाच्या एका विमानाचा अपघात पुणे विमानतळावर झाला. या अपघातामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती बंद केली गेली. धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले. विमान कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आल्याने अनेक येणाऱ्या विमानांना दुसऱ्या मार्गाने वळवावे लागले आहे.

दरम्यान, विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘सुदैवाने, विमानातील कर्मचारी सुरक्षित आहेत आणि नागरी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. विमान कंपन्यांना माहिती देण्यात आली आहे आणि धावपट्टीवरील कामकाज पुन्हा सुरू होण्यास काही वेळ लागू शकतो. या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी मी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे’.

अनेक विमाने वळवण्यात आली

पुणे विमानतळावर उतरणारी किमान आठ विमाने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोईम्बतूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली. रात्री सुमारे दरम्यान, 11.41 वाजता, भारतीय हवाई दलाच्या माध्यम समन्वय केंद्राने एका पोस्टमध्ये सांगितले की, या घटनेमुळे धावपट्टी उपलब्ध नाही. तसेच, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही नागरी मालमत्ता खराब झालेली नाही, असेही त्यात नमूद केले आहे.

Ahilyanagar News : घरकुल अनुदानात ५० हजारांची वाढ; पारनेरमध्ये विकासकामांच्या आढावा बैठकीत आमदार दाते यांची महत्त्वपूर्ण माहिती

Web Title: Indian air force aircraft crashes at pune airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 07:47 AM

Topics:  

  • Indian Air Force
  • Pune Airport

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.