Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शोध आणि बचावकार्य दुसऱ्या दिवशीही सुरू; 119 अजूनही बेपत्ता, पावसामुळं शोध कार्यात अडथळा…

आतापर्यंत 16 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही शोधकार्य सुरु आहे. काल सांयकाळी अंधूक प्रकाश व पावसामुळं बचावकार्य थांबवले, पण आज पुन्हा पहाटेपासून सुरु केले आहे. दरम्यान, 119 अजूनही बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 21, 2023 | 11:31 AM
शोध आणि बचावकार्य दुसऱ्या दिवशीही सुरू; 119 अजूनही बेपत्ता, पावसामुळं शोध कार्यात अडथळा…
Follow Us
Close
Follow Us:

खारघर -गुरुवारीची पहाट महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी व दु:ख देणारी होती. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. यामध्ये 16 जणांना जीव गमवावा लागला, तर 100 जणांचे प्राण वाचवले आहेत. कोकणात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून 100 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत 16 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. तर अजूनही शोधकार्य सुरु आहे. काल सांयकाळी अंधूक प्रकाश व पावसामुळं बचावकार्य थांबवले, पण आज पुन्हा सकाळपासून सुरु केले आहे. दरम्यान, शोध आणि बचावकार्य दुसऱ्या दिवशीही सुरु असून, 119 अजूनही बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

119 अजूनही बेपत्ता…

दरम्यान, आतापर्यंत 16 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही शोधकार्य सुरु आहे. काल सांयकाळी अंधूक प्रकाश व पावसामुळं बचावकार्य थांबवले, पण आज पुन्हा पहाटेपासून सुरु केले आहे. दरम्यान, 119 अजूनही बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पावसामुळं शोध कार्यात अडथळा येत आहे. आजही या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाकडून (IMD) रेड अलर्ट देण्यात आला आहे.

अनेक संस्था, मंडळे यांचा मदतीचा हात, आज लालबागचा राजा

दरम्यान, या दुर्घटनेनंतर अनेक संस्था, मंडळे यांनी मदतीचा हात पुढे केले आहे. तर आज लालबागचा राजा हे प्रसिद्ध मंडळ तिथे जाणार आहे. ईर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीत हानी झाली आहे. तसेच अनेक जख्मींवर उपचार देखील सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेत जख्मी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आज मोठी मदत घेऊन निघणार आहेत. दोन मोठे टेम्पो मधून ही मदत पोहचवली जाणार आहे. ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ तसेच विविध अन्नपदार्थ , ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जिवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून ईर्शाळवाडीकडे रवाना होणार आहे.

Web Title: Irshalwadi accident update search and rescue operations continued the next day one hundred ninteen still missing rain hinders search

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2023 | 11:31 AM

Topics:  

  • रायगड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.