Jalgaon Municipal Corporation: जमीन आरक्षणातून कोटींचा घोटाळा! नगरसेवक अरविंद देशमुखः मक्तेदारासोबत संगनमताचा केला आरोप

जळगाव महापालिकेच्या जमीन आरक्षण प्रक्रियेत सुमारे दहा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी स्थायी समितीच्या सभेत केला.
Jalgaon
Jalgaon (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • जळगाव महापालिकेच्या जमीन आरक्षणात घोटाळ्याचा आरोप.

  • भाजप नगरसेवक अरविंद देशमुख यांचा दहा कोटींच्या भ्रष्टाचाराचा दावा.

  • अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटवल्याचा आणि अंबरझरा तलाव गायब केल्याचा आरोप.

जळगाव (वा.) महापालिकेत जमीन आरक्षण करण्यातून सुमारे दहा कोटीचा घोटाळा करण्यात आला आहे. याबाबत आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. असा खळबळजनक आरोप भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत केला आहे.

सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील पीठासीन अध्यक्ष होते. उपायुक्त धनश्री शिंदे, निर्मला गायकवाड, शहर अभियंता आर.डी.पाटील. नगरसचिव मनोज शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.

जमिन आरक्षणात भ्रष्टाचार

नगरसेवक अरविंद देशमुख यांनी नुकताच मंजूर करण्यात आलेल्या शहर विकासाच्या आराखड्याचा नकाशा सभागृहात सादर केला. त्यानुसार त्यांनी आरोप केला कि, मेहरूण येथील अत्यंत ओबडधोबड असलेली जमीन महापालिकेने आरक्षित केलेली आहे. आज त्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे आहेत. शहरातील बांधकाम व्यवसायिक खटोड यांची ती जमिन आहे. महापालिकेने ती एका प्रकल्पासाठी आरक्षित केलेली आहे. या जमिनीच्या शेजारीच महापालिकेच्या मालकीची चांगली जागा आहे. त्या ठिकाणी मात्र हा प्रकल्प न करता ही अंत्यत मोठ मोठे खड्डे व एकदम खंडहर असलेली जमीन आरक्षीत करण्यात आलेली आहे. याची मोठया प्रमाणात रक्कम त्यांना अदा करण्यात येणार आहे.

Jalgaon
Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप

अधिकाऱ्यांचे षडयंत्र ....

महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे, शहरातील बिल्डर्सचे खराब जमिनीवर आरक्षण टाकायचे भविष्यात त्या जमिनीचे कोट्यवधी रूपये महापालिकेकडे हे बिल्डर्स वसुल करीत असतात. आरक्षण करणारे अधिकारी बदलून जातात परंतु या जमिनीचा भुर्दंड जळगावकरांना बसतो.

दहा हजार कोटींचा भ्रष्टाचार ...

जळगाव शहरात जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डर्स फायदा देवून महापालिकेच्या अधिकाऱ्याऱ्यांनी तब्बल दहा घोटीचा घोटाळा केला असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. ते म्हणाले कि, जळगावातील मेहरूण जवळील करण्यात आलेले आरक्षण है भ्रष्टाचाराचे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. अजून यापेक्षा मोठ मोठे व्यवहार आरक्षणाच्या माध्यमातून झालेले आहेत. आपण तो महासभेत पुराव्यासह उघड करणार आहोत.

मेहरूण तलावाजवळील अग्निशामक केंद्र केले गायब...

मेहरूण तलावाजवळ अग्नीशामक दलासाठी राखीव जागा ठेवण्यात आली होती. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी है आरक्षणही उठविले. आज त्या ठिकाणी अग्नीशामक दल उभारणेही कठीण आहे, या ठिकाणी वस्ती वाढत आहे. भविष्यात या ठिकाणी आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Jalgaon
Jalgaon News: सणांचा उत्साह अन् बसस्थानक हाऊसफुल्ल! एरंडोल आगाराची 10 लाखांच्या कमाईकडे झेप

अंबरझरा तलाव खाल्ला

महापालिकेच्या नगररचना विभागात सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मेहरूण तलावा जवळ असलेला अंबरझरा तलाव गायब झाला आहे.या अधिकाऱ्यांनी हा अख्खा तलाव खावून घेतला आहे.

नगररचनाकार अमोल पाटलांची चौकशी करा

महापालिकेचे नगररचनाकार अमोल पाटील यांनी मोठ्या प्रमाणता गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करून नगरसेवक देशमुख म्हणाले, कि अमोल पाटील हे गेला एक महिन्यापासून कार्यालयात नाहीत. ते एका गुप्त ठिकाणी बसून गावातील काही बिल्डर्स सोबत बसून त्यांनी प्रारूप आरखडयात मोठ्या प्रमाणात आरक्षण करून गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.