Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव दिवाळी पर्वातील अत्यंत महत्त्वाचे सण मानल्या जाणाऱ्या ‘दिवाळी पाडवा’ आणि ‘भाऊबीज’ या निमित्ताने ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून एरंडोल बसस्थानकात प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. एरव्हीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत तब्बल दुपटीने वाढ झाली असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगार प्रशासनाकडून जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
Jalgaon News: ना बंगला, ना झगमगाट… पालकमंत्र्यांनी साजरी केली बंजारा बांधवांसोबत दिवाळी
या वाढत्या प्रवासी संख्येमुळे एरंडोल बस आगाराला दररोज ९ ते १० लाख रुपयांपर्यंतचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची शक्यता आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी वर्तवली आहे. सणासुदीनिमित्त वाढलेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या सुमारास विभाग नियंत्रक -प्रज्ञेश बोरसे यांनी एरंडोल बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रवाशांचा खोळंबा होऊ नये आणि – त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तातडीने जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी एरंडोल आगार प्रशासनाला दिले.
Ans: दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यामुळे बसस्थानकावर गर्दी झाली आहे.
Ans: नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे.
Ans: आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या मते, दररोज 9 ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.






