जालना : अजित पवार-शरद पवारांना नाशिकपासून ते पुण्यापर्यंतचा रेल्वे मार्ग हवा आहे. मी त्यासाठी तयार आहे. पण त्यासाठी दोन्ही सरकारची 50-50 टक्के भागिदारी हवी. या कामासाठी राज्य सरकार 70 टक्के हिस्सा देत आहे तर समृद्धी महामार्गाला का देत नाही, असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे(Give Balasaheb’s name to Samrudhi Highway and give half the amount; Demand of Union Minister of State Raosaheb Danve to the Chief Minister).
समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले. आम्ही या मार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. गोष्ट चांगली आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो असता महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देत आहात तर 50 टक्के पैसे तुम्ही द्या, 50 टक्के पैसे आम्ही देतो. मुंबईपासून ते नागपूरपर्यंतचा रस्ता आपण करू, असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले, असे दानवे म्हणाले.
जालन्यात एका सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवे बोलत होते. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गती द्यायची असेल तर राज्यातील नव्या रेल्वेमार्गाचा पन्नास टक्के खर्चाचा भार राज्य शासनाने उचलावा, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली. या पुढील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारकडे पाठपुरावा करा, असे सांगत राज्य सरकार निधी देत नसल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यमंत्री दानवे यांनी केला. राज्यातील रेल्वे मागण्यांसंदर्भात शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना भेटलो. राज्याने अटी मान्य केल्यानंतर रेल्वेचा मार्ग कुठून कसा असेल याचे प्राधान्य ठरवा. थांबा कुठून कुठपर्यंत करायचा हेही ठरवा, असे दानवे म्हणाले.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या संदर्भातील तपशीलवार अहवाल (डीपीआर) या महिन्यात तयार होईल. त्यामुळे मुंबईहून एक तास 40 मिनिटांत औरंगाबादला पोहोचता येईल. या समृद्धी महामार्गाजवळून जाणाऱ्या रेल्वेसाठी आणखी 38 टक्के जागेची गरज असून समृद्धी महामार्ग औरंगाबादपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन वळसा घेऊन औरंगाबादच्या मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत नेऊन शेंद्रामार्गे वळविण्यासाठी भूसंपादन आवश्यक असल्याचे रावसाहेब म्हणाले.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]