सौजन्य - नवराष्ट्र टीम
काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील म्हणाले, ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. हे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पुढील सात दिवस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मविआच्या उमेदवारांची योग्यता मतदारांना पटवून दिली पाहिजे.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशाचा मूळ डीएनए हा संविधान आणि लोकशाही मानणारा आहे, पण हा डीएनए बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाचे वाटोळे करण्याचे पाप मोदी-शहा करत आहेत. ही निवडणूक केवळ पदवीधर किंवा शिक्षकांची नसून देशाच्या अस्तित्वाची आणि लोकशाहीची ज्योत अखंड ठेवण्याची लढाई आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि या बदलाचे खरे शिलेदार आपल्याला व्हायचे आहे असे सांगून सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देऊया असे आवाहन केले.
हर्षदा देशमुख-जाधव यांनी युवकांमध्ये आज प्रचंड रोष आहे. ही निवडणूक म्हणजे परिवर्तनाची नांदी असून, दडपशाही संपवून लोकशाहीचा विजय निश्चित करण्याची हीच वेळ आहे असे प्रतिपादन केले.
भाजपचा मित्रपक्षांवर अजिबात विश्वास नाही! – जयंत पाटील
मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर अत्यंत टोकाची टीका केली. भाजपने एक यादी जाहीर केली असून, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जिथे आहेत, तिथेच भाजपचे आमदार-खासदार निरीक्षक म्हणून नेमले आहेत. यावरून स्पष्ट होते की भाजपचा त्यांच्याच मित्रपक्षांवर तिळमात्र विश्वास नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.
सतेज पाटलांनी कंबर कसली ; प्रचाराची सूत्रे हातात घेतली!
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सोलापुरात प्रचाराची प्रत्यक्ष धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मेळाव्यानंतर खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व मविआच्या सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष नियोजन बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत प्रचार यंत्रणेचा सखोल आढावा घेऊन प्रत्येक नेत्याला आणि पदाधिकाऱ्याला जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. जास्तीत जास्त मतदान करून मविआच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Ans: मतदार याद्यांमधील घोळामुळे लोकांचा निवडणुकांवरील विश्वास उडाल्याचे विधान जयंत पाटील यांनी केले.
Ans: महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील जनतेचा रोष मतपेटीतून व्यक्त करण्याची सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले.
Ans: महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.






