महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुका आणि त्यानिमित्ताने होत असलेले राजकारण यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आता एक दोन दिवसात उमेदवारी यादी जाहीर होईल. त्यानंतर काय घडेल याची चुणूक दिसू लागली आहे.
महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी झाली आहे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला साेबत घेऊ नका, असा आदेशच प्रदेश नेत्यांनी दिल्याने पुण्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांसमाेरील अडचणी वाढल्या आहेत.
Minakshi Shinde: ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Voter ID online News: राज्यात महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक असलेले 'वोटर आयडी' आता आधार ई-साइन (e-Sign) द्वारे घरबसल्या ऑनलाईन मिळवता येईल.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे नाका कामगारांची चांदी झाली आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी ५०० ते १५०० रुपयांची रोजंदारी मिळत असून, १५ जानेवारीपर्यंत कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत.
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभाग क्रमांक ३७ चे इच्छुक उमेदवार बालाजी पवार यांनी काल प्रचाराला सुरुवात केली. एक नोट द्या, एक वोट द्या ही संकल्पना जनतेसमोर मांडून ते प्रचार करत आहेत.