वारीमधील महाआरोग्य शिबिरावरुन विरोधक आक्रमक
पंढरपूर : लवकरच राज्यामध्ये वारकरी संप्रदायाची वारी निघणार आहे. वैष्णवांचा मेळा म्हणून ओळख असलेल्या या वारीमध्ये हरीनामाचा जप करत लाखो भाविक सहभागी होत असतात. राज्य सरकारकडून वारकरींची सोय सुविधा केली जाते. याचे नियोजन सध्या सुरु आहे. पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या शिबिरांवर करण्यात येणार असलेल्या कोट्यवधी रुपयांवरुन विरोधक आक्रमक झाले आहे. यावरुन शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहे. वारीच्या या खर्चाचा लेखाजोखा त्यांच्याकडून मांडण्यात येत आहे.सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आव्हाड यांनी आपला रोष व्यक्त करत आहेत.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
‘विठ्ठलाच्या नावाने दरोडा ! दे देते भगवान को धोका, इन्सान को क्या छोडेंगे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आय़ोजित करण्यात आली आहेत. वाकऱ्यांसाठी 2 कोटी 40 लाखांची औषधे खरेदी केली जाणार आहत. तर आरोग्य शिबीरात तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंढरपूर येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखाल होत असतात. त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, गेल्या वर्षापासून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात महाआरोग्य शिबिराचे आय़ोजन केले जाते. त्यासाठी राज्य शासन आर्थिक तरतूद करतो. यंदा तीन ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. त्यासाठी 9 कोटी 44 लाखांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये २ कोटी ४० लाख रुपयांच्या औषधींचे वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तैनात ४ हजार ३२० मनुष्यबळाच्या जेवणाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये केला जाणार आहे. जो इतर खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाआरोग्य शिबिरासाठी मंडप, सीसीटीव्ही, साहित्य, वाहतूक यासाठी एकूण ९ कोटी ४४ लाख रुपये खर्च राज्य सरकारने मंजूर केला आहे. तीन ठिकाणी तीन दिवसांसाठी हे आरोग्य शिबिर होणार आहे. तेथे वारकऱ्यांना मोफत उपचार व औषधी पुरविली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाला राज्य सरकारचे अवर सचिव अ. भि. मोरे यांनी मंजुरी दिली आहे. यात एकूण खर्च 9 कोटी 40 होणार असून, वारकऱ्यांच्या वाट्याला मात्र केवळ २ कोटी ४० लाखांची औषधी येणार आहेत. उर्वरित ७ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.’
विठ्ठलाच्या नावाने दरोडा दे देते भगवान को धोका
इन्सान को क्या छोडेंगे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिरे आय़ोजित करण्यात आली आहेत. वाकऱ्यांसाठी 2 कोटी 40 लाखांची औषधे खरेदी केली जाणार आहत. तर आरोग्य शिबीरात तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य… — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 17, 2024
जेवणावर होणार 3 कोटींचा खर्च
महाआरोग्य शिबिराचे अंदाजित खर्च