Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईत तीन वर्षात २०० हुन अधिक किडनी ट्रान्सप्लांट पूर्ण, कोरोना महामारीत देखील अपोलो रीनल ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमचे यश

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट्सच्या अनुभवी टीमने २०० पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्स केले याची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या रीनल ट्रान्सप्लांट टीमने काही अशी उल्लेखनीय निरीक्षणे प्रस्तुत केली ज्यामध्ये दिसून आले आहे की किडनी ट्रान्सप्लांट्समुळे लघु व दीर्घ कालावधीत मिळणाऱ्या अधिक चांगल्या परिणामांसह डायालिसिसच्या तुलनेने अधिक जीव वाचवले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 19, 2022 | 12:57 PM
नवी मुंबईत तीन वर्षात २०० हुन अधिक किडनी ट्रान्सप्लांट पूर्ण, कोरोना महामारीत देखील अपोलो रीनल ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमचे यश
Follow Us
Follow Us:

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने २०० पेक्षा जास्त जीवन-रक्षक किडनी ट्रान्सप्लांट्स तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या रीनल ट्रान्सप्लांट्स प्रोग्रॅममध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात करण्यात आलेल्या किडनी ट्रान्सप्लांट्सचा देखील यामध्ये समावेश असल्याने हे यश अधिक जास्त कौतुकास्पद आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट्सच्या अनुभवी टीमने २०० पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्स केले याची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या रीनल ट्रान्सप्लांट टीमने काही अशी उल्लेखनीय निरीक्षणे प्रस्तुत केली ज्यामध्ये दिसून आले आहे की किडनी ट्रान्सप्लांट्समुळे लघु व दीर्घ कालावधीत मिळणाऱ्या अधिक चांगल्या परिणामांसह डायालिसिसच्या तुलनेने अधिक जीव वाचवले आहेत. किडनी ट्रान्सप्लांट्सचा यशस्वी होण्याचा दर ९९% पेक्षा जास्त आहे आणि गुंतागुंतीची ट्रान्सप्लांट्स देखील यशस्वीपणे केली गेली आहेत, ज्यामध्ये एबीओ-इन्कॉम्पॅटिबल (मिसमॅच ब्लड ग्रुप) ट्रान्सप्लांट्स आणि रिपीट (दुसऱ्यांदा) ट्रान्सप्लांट केसेसचा देखील समावेश आहे. अपोलो नवी मुंबई हे रीनल ट्रान्सप्लांट सेंटर केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्ता व आशेचा मोठा किरण आहे. कोविडच्या केसेस कमी होऊ लागल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील प्रतिबंध शिथिल केले जाताच मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल पुन्हा सुरु झाले.१५ परदेशी रुग्णांवर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आल्या.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट रोबोटिक युरॉलॉजिस्ट आणि रीनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.अमोलकुमार पाटील यांनी सांगितले, “अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये सर्जिकल तंत्रज्ञानाचे सतत अपग्रेडेशन केले जाते, आजच्या काळात कमीत कमी इन्व्हेसिव्ह तंत्र सर्वात जास्त वापरली जातात. यामुळे सर्जरीनंतर होणाऱ्या वेदना अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात ठेवता येतात, रुग्णाची तब्येत लवकरात लवकर बरी होते आणि शरीरावर सर्जरीच्या खुणा देखील राहत नाही आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानासह अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या परिणामांचे असे पर्याय उपलब्ध आहेत जे जगातील सर्वोत्कृष्ट पर्यायांच्या तोडीचे आहेत. सकारात्मक क्लिनिकल परिणाम आणि जागतिक स्तरावरील अनुभवांमुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे भारत आणि जगभरातील रुग्णांसाठी एक लोकप्रिय पर्याय बनले आहे.”

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे रिजनल सीईओ वेस्टर्न रिजन श्री. संतोष मराठे यांनी सांगितले, “भारतात पहिली ऑर्गन ट्रान्सप्लांट रजिस्ट्री विकसित करण्यापासून भारतातील काही महत्त्वाच्या किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यापर्यंत, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामार्फत सक्षम ट्रान्सप्लांट सर्जरीसह दर्जेदार परिणाम प्रदान करण्यात नेहमी आघाडीवर आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये किडनी ट्रान्सप्लांट टीमचे नेतृत्व देशातील काही सर्वोत्तम व अनुभवी ट्रान्सप्लांट सर्जन्स करत आहेत. टीमला विविध क्षेत्रातील विशेषज्ञांचे सहकार्य मिळते, ज्यामध्ये नेफ्रोलॉजिस्ट्स, युरॉलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, सामाजिक कार्यकर्ते, मनोवैज्ञानिक आणि एनेस्थिसियोलॉजिस्ट यांचा समावेश आहे, ही टीम जगभरातील सर्वोत्कृष्ट परिणामांच्या तोडीचे परिणाम प्रदान करते. आम्हाला आमच्या सेवांच्या पोर्टफोलिओमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सेंटरमार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या विशिष्ट सेवांचा अभिमान वाटतो.”

Web Title: Kindly transplent in navi mumbai above 200 kidny transppent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2022 | 12:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.