जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने केवळ एक जागा जादा मागितली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळसह इतर सहकारी संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने केवळ एक जागा जादा मागितली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळसह इतर सहकारी संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत कोणाचे तरी ऐकूण काँग्रेस-राष्ट्रवादीने डावलल्यामुळेच शिवसेनेला स्वतंत्रपणे मैदानात उतरावे लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसोबत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी व्यक्त केला.
क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की “कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गोकुळप्रमाणेच महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टीने चर्चाही सुरू होती. जिल्हा बँकेत सध्या खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी खासदार निवेदिता माने हे दोन विद्यमान संचालक आहेत. त्या वगळता आम्ही आणखी एक जादा जागा मागत होतो. गटाबाबत आमचा कोणताही आग्रह नव्हता. कोणत्याही गटातील द्या, पण शिवसेनेला आणखी एक जादा जागा हवी होती. तसा प्रस्तावही आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दिला होता.
नेहमीप्रमाणे त्यावर चर्चेचे गुऱ्हाळ झाले. माघारीच्या दिवशी अपेक्षित निर्णय घेतील म्हणून शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु राजकारणात विश्वासघाताची परंपरा असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माघारीची मुदत संपण्याआधी काहीकाळ शिवसेनेला जागा देण्यास नकार दिला. वेळ कमी होता, त्यामुळे शिवसेनेचे पॅनेल होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटत होते. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकवटले आणि पुढाकार घेऊन पॅनेलसाठी सूत्रे हलविली.
Web Title: District bank monopoly will be broken says rajesh kshirsagar nrka