''... अरे कोंबड्या बघुयात तरी तुझ्यात जोर आहे का? '' सदाभाऊ खोतांचा 'या' नेत्यावर जोरदार हल्लाबोल
शिराळा: राज्यात विधानसभा निवडणूक जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज खडाजंगी पाहायला मिळते. दरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील महाविकास आघाडी, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सदाभाऊ खोत हे शिराळा येथील रयत क्रांती पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संजय राऊतांवर त्यांनी एक घर कोंबडा रोज बांग देतो या परकराची टीका केली आहे.
शिराळा येथील एका कार्यक्रमात बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ”संजय राऊत नावाचा एक घर कोंबडा रोज बांग देतो. त्या कोंबड्याला मी सांगतो, रोज बांग देऊ नकोस. त्यापेक्षा माझी उबाठा सेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पाठिंबा देत आहे, अशा प्रकारचे एक पत्र मनोज जरांगे पाटील यांना लिहून दे. अरे कोंबड्या बघुयात तरी तुझ्यात जोर आहे का? ”
पुढे बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ”शरद पवार आणि रोहित पवारांनी राज्यात आग लावण्याचं काम बंद करावे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वळू-रेड्यांना चाबकाने फोडून काढणार. जी लोक महाविकास आघाडीतून निवडून आली आहेत. त्यांनी सरकारला व मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास माझा पाठिंबा आहे असे पत्र द्यावे. रोहित पवार विद्वान माणूस आहे. महाराष्ट्रात आग लावत सुटला आहे. महाराष्ट्रात तुम्ही भाडोत्री सोशल मीडिया ठेवला आहे. लोकसभेला जमलं म्हणून आता ही जमेल ही भावना मनातून काढून टाका.
हेही वाचा:
पडळकरांची शरद पवारांवर टीका
सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल.” पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास थांबवून पुन्हा सरंजामी राजवट आणायची आहे का? दलित-ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?, अशी खोचक टीका पडळकर यांनी शरद पवारांवर केली आहे.