Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मूलभूत सुविधांच्या उभारणीची परंपरा भविष्यात कायम…”; रणजीत शिंदेंचे जनतेला भावनिक आवाहन

मागील पंधरा वर्षात मी केलेल्या विकास कामाची पोहोच म्हणून तुम्ही मतदारांनी रणजीत शिंदेला भरघोस मतदान करून विजयी करावे, असे आमदार बबनराव शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2024 | 04:24 PM
"मूलभूत सुविधांच्या उभारणीची परंपरा भविष्यात कायम..."; रणजीत शिंदेंचे जनतेला भावनिक आवाहन

"मूलभूत सुविधांच्या उभारणीची परंपरा भविष्यात कायम..."; रणजीत शिंदेंचे जनतेला भावनिक आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

बेंबळे: सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आमदार बबनदादांनी या 42 गावात कोट्यावधी रुपयाचा विकास निधी देऊन रस्ते वीज मूलभूत सुविधांची उभारणी केली. हीच परंपरा भविष्यात कायम चालू ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला नागरिकांनी सफरचंद या चिन्हा पुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला विजयी करा असे आव्हान माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांनी केले आहे ,ते तुंगत (ता.पंढरपूर)येथील जाहीर प्रचार सभेत बोलत होते. आज यापूर्वी नेमतवाडी पिराची कुरोली ( चिंचणी टप्पा), चिंचणी ,वाडी कुरोली या गावीही प्रचार सभांचे आयोजन केले होते.

रणजीत शिंदे पुढे म्हणाले की समोरची मंडळी विकास कामा विषयी न बोलता इतर बाबीवर ‘खोटं पण रेटून बोलतात’ परंतु जनतेने त्यांना चांगलेच ओळखलेले आहे. उसाचा वजन काटा मारणे, उसाचा दराचा बडीजावा करणे याबाबत दिशाभूल केली जात आहे. सर्वांना माहित आहे की करकंबचा विठ्ठलराव शिंदे युनिट दोन हा आम्ही डीसीसी बँकेकडून लिलावात विकत घेतला आहे व यामध्ये 42 गावातील ऊस गळीतास प्राधान्य देऊन दहा दिवसाला ऊस बिल दिले जात आहे.आम्ही मागील दोन ते तीन वर्षापासून सांगत आहोत की शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे वजन कोणत्याही काट्यावर करून आणावे आमची कोणतीही हरकत नाही,आम्ही त्याचा स्वीकार करू ….पण खोट्या प्रचाराला बळी पडू नका . दोन वर्षांपूर्वी कोणाच्या कारखान्यावर शेतकऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची उसाच्या वजनावरून भांडणे झाली व वजन काटा बंद पडला हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे.

विठ्ठल कारखान्याने यावर्षी 2825 रुपये दर दिलाआहे, परंतु सांगताना मात्र हा उमेदवार अनुदानासह दिलेला 3000 रुपये दर दिला असं सर्वत्र सांगतो, परंतु आम्ही 2900 दर दिला आणि अनुदानासहित 30 15 रुपये दर दिलेला आहे पण आम्ही कधीही भपका करत नाही. रणजीत शिंदे म्हणाले की मी सरपंच, पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा दूध संघाचा चेअरमन म्हणून काम करत असताना मोठा अनुभव घेतलेला आहे. आमदार बबनदादा शिंदे यांनी चालू ठेवलेले सामाजिक उपक्रम म्हणजेच सामुदायिक विवाह सोहळा काशीयात्रा तुळजापूर अजमेर बौद्धगया यात्रा नेत्र शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर व इतर अनेक विकासाचा प्रवाह चालूच राहील यावर विश्वास ठेवा, म्हणून मतदारांनी भूलथापांना बळी न पडता 20 तारखेला सफरचंद या चिन्हा पुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावे व सेवेची संधी द्यावीअसे आव्हान रणजीत शिंदे यांनी यावेळी केले.

हेही वाचा: “माढा तालुक्याला कुणाची दृष्ट लागू देऊ नका”; मुलासाठी बबनराव शिंदेंकडून मतदारांना भावनिक साद

ही निवडणूक जिंकलेली आहे , फक्त तुम्ही मतदानाविषयी गाफील राहू नका….

याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की मागील पंधरा वर्षात मी केलेल्या विकास कामाची पोहोच म्हणून तुम्ही मतदारांनी रणजीत शिंदेला भरघोस मतदान करून विजयी करावे. समोरचा विरोधी उमेदवार खोट्या अफवा पसरवण्यात तरबेज आहे ,तो म्हणतो की जिल्ह्यातील साखर कारखानदारांची मीटिंग होऊन विठ्ठल बंद पाडण्याचे षडयंत्र झाले जात आहे , पण हे सर्व खोटे आहे अशी कुठलीही जिल्ह्यात मीटिंग झाली नाही, कोणत्याही साखर कारखानदाराला विचारा तुम्हाला सत्य कळेल. वस्तुस्थिती अशी आहे की गुरसाळ्याच्या विठ्ठल कारखान्यावर 700 कोटीचे पहिलेच कर्ज आहे पुन्हा याला 267 कोटी कर्ज मिळाले आहे.

हे कर्ज मिळण्यासाठी यांनी किती नाटकं केली हे पंढरपूर सहित सगळ्या जनतेला माहित आहे, तरी पण कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे पैसे याने अद्याप दिलेले नाहीत व मिळालेल्या पैशातून निवडणुकीसाठी वारे माप उधळण चालू आहे हे आपण सर्वजण पाहता आहात .त्याच्या वाईट कर्माचे फळ त्याला मिळणारच आहे म्हणून, त्याच्या भूलथापांना बळी न पडता ,त्याची कुटील नीती जाणून घ्या… हा गडी समोरच्यांची फसवणूक करून दिशाभूल करण्यात तरबेज आहे, पण मतदान करताना फसू नका ,मतपत्रिकेत दहा नंबरला रणजीत शिंदे यांची खूण सफरचंद आहे, घरोघरी आपण प्रचार करून सफरचंद चिन्हा पुढील बटन दाबून मतदान करणे विषयी सर्वांना समजावून सांगा, ही निवडणूक आता आपण 100% जिंकलेलीच आहे. पण कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असेही आमदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
चौकट… बबनदादांनी संस्कारची परंपरा जपली म्हणून ते सर्वांना आपले वाटतात.

हेही वाचा:  माढा विधानसभेत रणजीत शिंदेंचा विजय निश्चित; आमदार बबनराव शिंदेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त

स्वर्गीय सुधाकर परिचारक औदुंबर आण्णा पाटील यशवंत भाऊ पाटील वसंतराव काळे राजू बापू पाटील यांच्या संस्कारा वारसा वारसा आदरणी बबन दादांनी मागील पंधरा वर्षे या 42 गावात जपला आहे ,म्हणून त्यांचे वर जनतेने अफाट प्रेम केले आहे व विश्वास ठेवला आहे. म्हणून आम्हा युवा पिढी पुढे या वडीलधाऱ्यांचा एक आदर्श निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण या निवडणुकीत रणजीत शिंदे यांना मोठे मताधिक्य द्यावे आणि वडीलधाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे शेतकऱ्यांना वैभवाचे आलेले दिवस हे पुढेही चालू ठेवण्याची परंपरा कायम ठेवावी म्हणून काळजीपूर्वक मतदान करून रणजीत शिंदे यांना विजयी करा ,सरकार कोणतीही येऊ द्या दबदबा शिंदेंचाच असणार याची सर्वांना खात्री आहे.

याप्रसंगी तानाजी रणदिवे आगतराव रणदिवे उपसरपंच प्रकाश रणदिवे सागर रणदिवे दिलीप काका रणदिवे महादेव देठे प्राध्यापक मारुती जाधव समाधान पाटील वामनराव माने आदी मान्यवरांनी आपले समयोचित विचार व्यक्त करून रणजीत शिंदे यांना विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्टा करायची असे प्रतिपादन केले. या प्रचंड मोठ्या प्रचार सभेसाठी तुंगत परिसरातील अनेक गावातील नागरिक महिला बंधू भगिनी गावोगावचे सरपंच सहकारी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Madha assembly candidate ranjit shinde appeal to people will elect me for development election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Madha
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ
1

माढा हादरलं! जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार; अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन
2

माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन

Crime News Updates : माढ्यात वाळू माफियांची गुंडगिरी, तहसीलदाराला मारण्याचा प्रयत्न
3

Crime News Updates : माढ्यात वाळू माफियांची गुंडगिरी, तहसीलदाराला मारण्याचा प्रयत्न

Madha Accident News: दुर्दैवी ! टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी
4

Madha Accident News: दुर्दैवी ! टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.