
न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, सकाळपासून मतमोजणी केंद्रांवर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या निकालाकडे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे या निकालातून स्पष्ट होणार आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून मतमोजणीचे निकाल येत असून, Maharashtra Nagar Palika–Nagar Panchayat Election Result 2025 LIVE अपडेट्सवर नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट;
राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालासंदर्बात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला. त्यानंतर राज्यात काही नगरपरिषदांबाबत नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर काल म्हणजे २० डिसेंबरला मतदान पार पडले. सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, नाहीतर २० नगरपरिषदांच्या निकालांवरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. यानंतर उच्च न्यायालयाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले.
राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकांनंतर आता मतमोजणीची प्रक्रिया 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. दरम्यान, सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी तसेच 76 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडले. या सर्व ठिकाणांची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निकालांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आज विविध जिल्ह्यांतील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी पार पडत आहे. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, निकाल हळूहळू जाहीर होत आहेत.
Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला
आज मतमोजणी होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायती पुढीलप्रमाणे —
छत्रपती संभाजीनगर (7) :
फुलंब्री (नगरपंचायत), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर
जालना (3) :
अंबड, भोकरदन, परतूर
नांदेड (13) :
बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (नगरपंचायत), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा
परभणी (7) :
गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ
बीड (6) :
अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, परळी-वैजनाथ
लातूर (5) :
अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर (नगरपंचायत), उदगीर
शेवटच्या क्षणी शुभमन गिलसोबत असे काय घडले? का वगळण्यात आले संघातून…जाणून घ्या संपूर्ण कहाणी
हिंगोली (3) :
हिंगोली, वसमत, कळमनुरी
धाराशिव (8) :
भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा
या निकालांमुळे संबंधित जिल्ह्यांतील स्थानिक राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून, प्रमुख राजकीय पक्षांची कामगिरी आणि सत्ता कुणाच्या हाती जाते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE अपडेट्ससाठी वाचक उत्सुक आहेत.