Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान १६ फायली गहाळ! २४ तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Jeffrey Epstein DOJ files missing December 2025 : जगातील सर्वात वादग्रस्त सेक्स रॅकेट प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेफ्री एपस्टाईन(Jeffrey Epstein) प्रकरणाने आता एक नवीन आणि धक्कादायक वळण घेतले आहे. अमेरिकेच्या (America) न्याय विभागाने (Department of Justice) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या काही फाईल्स अचानक ‘डिलिट’ केल्याने अमेरिकेत मोठा गोंधळ उडाला आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एपस्टाईनसोबतचा फोटोही गायब झाल्याने, ‘महत्त्वाचे सत्य लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शुक्रवारी अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक पारदर्शकतेचा भाग म्हणून एपस्टाईनशी संबंधित शेकडो पाने आणि फोटो वेबसाइटवर अपलोड केले होते. मात्र, अवघ्या २४ तासांच्या आत त्यातील १६ महत्त्वाच्या फाईल्स गुपचूप काढून टाकण्यात आल्या. या फाईल्समध्ये एपस्टाईनच्या खाजगी मालमत्तेचे, त्याच्या घरातील फर्निचरचे आणि काही आक्षेपार्ह वाटतील अशा छायाचित्रांचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे, यामध्ये डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि घिसलेन मॅक्सवेल यांचा एपस्टाईनसोबतचा एक एकत्रित फोटो होता, जो आता वेबसाइटवर कुठेही दिसत नाहीये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Jeffrey Epstein: जगातील सर्वात मोठे स्कँडल! पण ट्रम्पसाठी फाईल्समध्ये दस्तऐवजांची फेरबदल कूटनीती; ‘अनेक’ नावे गुलदस्त्यात
फाईल्स का हटवण्यात आल्या, यावर न्याय विभागाने (DOJ) अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. ही तांत्रिक चूक आहे की जाणूनबुजून केलेली कृती, याबद्दल विभागाने मौन बाळगले आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या फाईल्समध्ये अशी काही माहिती होती जी कदाचित सत्तेत बसलेल्या बड्या हस्तींसाठी अडचणीची ठरू शकत होती.
According to Aaron Parnas, 16 Epstein files have been deleted today by the DOJ without any explanation after their initial release yesterday… -DW pic.twitter.com/6oYjnjT4Es — DeSota Wilson (@desota) December 21, 2025
credit : social media and Twitter
आतापर्यंत समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे नाव अनेकदा आले आहे. मात्र, ट्रम्प यांचे नाव लेखी नोंदींमध्ये फारसे दिसत नाही. जेव्हा ट्रम्प आणि एपस्टाईन यांचा फोटो समोर आला, तेव्हा विरोधकांनी यावर आक्षेप घेतला होता. आता तोच फोटो अचानक गायब झाल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे की, त्यांचा एपस्टाईनच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांशी संबंध नव्हता आणि ते केवळ एक ‘सोशल ओळखी’चा भाग होते.
At least 16 files from Epstein release disappeared from DOJ webpage, including photo of Donald Trump, with no explanation, Associated Press reported. pic.twitter.com/E13rmu1PdL — Open Source Intel (@Osint613) December 20, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
गायब झालेल्या फाईल्समध्ये एपस्टाईनच्या खाजगी विमानाचे (ज्याला ‘लोलिता एक्सप्रेस’ म्हटले जायचे) उड्डाण नोंदी (Flight Logs) असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नोंदींमधून अनेक दिग्गज सेलिब्रिटी, राजकारणी आणि उद्योगपतींची नावे उघड होऊ शकतात. तांत्रिक कारणास्तव फाईल्स काढल्या असल्या तरी, ज्या पद्धतीने फक्त ट्रम्प यांचा फोटो आणि विशिष्ट फाईल्स हटवल्या गेल्या, त्याने अमेरिकन लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. येत्या काही दिवसांत जर या फाईल्स पुन्हा अपलोड झाल्या नाहीत, तर अमेरिकेतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. एपस्टाईन प्रकरणातील ही गूढ ‘डिजिटल चोरी’ भविष्यात कोणता नवीन खुलासा करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित १६ महत्त्वाच्या फाईल्स, ज्यामध्ये मालमत्तेचे फोटो आणि काही हाय-प्रोफाइल लोकांचे फोटो होते, त्या गायब झाल्या आहेत.
Ans: डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया आणि घिसलेन मॅक्सवेल यांचा एपस्टाईनसोबतचा एकत्रित फोटो वेबसाइटवरून हटवण्यात आला आहे.
Ans: न्याय विभागाने (DOJ) या फाईल्स हटवण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, ज्यामुळे संशय वाढला आहे.






