Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरूच राहणार; नेमकं काय आहे या आस्मानी संकटाचे कारण?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 28, 2025 | 09:10 AM
Maharashtra Rain Live Update:

Maharashtra Rain Live Update:

Follow Us
Close
Follow Us:
  • हवामान विभागाचा आजही अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा
  • मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
  •  रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Update Live News: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, बीडसह काही भागांत पूरस्थिती कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, “अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका,” असा इशाराही देण्यात आला आहे.

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे

कशामुळे राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय?

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते क्षेत्र जमिनीवर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. मुंबई व पालघरमध्येही पहाटेपासून पावसाने जोर धरला असून अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे.

मराठवाड्यातील शेतजमिनी तळ्यांत रूपांतरित झाल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांना वेडा पडला असून घरांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परिणामी रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

Dombivli Crime: संतापजनक! शाळेच्या मुख्याध्यापकानेच 6 वर्षांच्या विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

– रेड अलर्ट – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा
– ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
– यलो अलर्ट – नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, सांगली, सोलापूर, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा

Web Title: Maharashtra rain live update what is the exact reason for the heavy rain in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत
1

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Sanjay Raut : “भो*** सरकार आमचं आहे का? ही हरामखोर लोक; टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली
2

Sanjay Raut : “भो*** सरकार आमचं आहे का? ही हरामखोर लोक; टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली

माढा तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उंदरगावात अडवलं
3

माढा तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उंदरगावात अडवलं

राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
4

राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.