फोटो सौजन्य - istock
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम सर्वत्र होत आहे. गोंदिया जिल्ह्याला देखील पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्रावरच पडून आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागाद्वारे मोठ्या प्रमाणावर धान खरेदी केली जाते. खरेदी केंद्रावर असलेला धान राईस मिलमध्ये नेऊन त्याचा तांदूळ तयार करण्यात येतो. हा तांदूळ शासनाच्या गोडाऊनमध्ये दिला जातो. मात्र गेल्या खरीप आणि रब्बी हंगामातील धान अद्यापही खरेदी केंद्रावर पडून आहे.
हेदेखील वाचा-धक्कादायक! जालन्यात भरधाव टेम्पोची चौघांना धडक; चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
राईस मिलच्या आंदोलनामुळे धान आठ महिने खरेदी केंद्रावर पडून आहे. या आंदोलनानंतर शासन आणि राईस मिल यांच्यात वाटाघाटी झाली. यानंतर राईस मिल मालकांनी गोंदिया जिल्ह्यातील खरेदी केंद्रावरून धान उचलण्यास सुरुवात केली होती. पण पावसाळा सुरु झाल्याने यामध्य अनेक अडचणी निर्माण झाल्या. पावसामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर धान खरेदी केंद्रावरच पडून असल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा-राज्यात पावसाचा जोर ओसरला; रायगड आणि रत्नागिरीला आज हवामान विभागाचा यलो अलर्ट
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विभागाद्वारे मोठ्या प्रमाणावर धान खरेदी केली जाते. खरेदी केंद्रावर असलेला धान राईस मिलमध्ये नेऊन त्याचा तांदूळ तयार करण्यात येतो. हा तांदूळ शासनाच्या गोडाऊनमध्ये दिला जातो. गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम मिळून सुमारे 29 लाख 5 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे, आणि हा संपूर्ण धान शासकीय आधारभूत केंद्रावर असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. गेल्या आठ महिन्यांपासून हा धान केंद्रावरच पडून आहे. राईस मिलच्या आंदोलनामुळे धान आठ महिने खरेदी केंद्रावर पडून आहे. शासन आणि राईस मिल यांच्यात झालेल्या वाटाघाटीनंतर गेल्या काही दिवसापासून राईस मिलने खरेदी केंद्रावरून धान उचलण्यास सुरुवात केली होती. परंतु राईस मिलने आतापर्यंत जिल्ह्यातील खरेदी केंद्रावरून 9 लाख 5 हजार क्विंटल धान उचलला आहे. अद्यापही जिल्ह्यातील विविध गोडाऊनमध्ये 20 लाख क्विंटल धान पडून आहे.
याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितलं की, राईस मिलच्या आंदोलनामुळे धान आठ महिने खरेदी केंद्रावर पडून आहे. शासन आणि राईस मिल यांच्या वाटाघाटीनंतर राईस मिलने खरेदी केंद्रावरून धान उचलण्यास सुरुवात केली होती. परंतु राईस मिलने आतापर्यंत जिल्ह्यातील खरेदी केंद्रावरून 9 लाख 5 हजार क्विंटल धान उचलला आहे. जिल्ह्यातील विविध गोडाऊनमध्ये अद्यापही 20 लाख क्विंटल धान पडून आहे. सध्या राज्यात सर्वत्रच पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे गोडाऊन भागांमध्ये चिखल होत आहे, यामुळे राईस मिलने धान उचलला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसाने उसंत घेतल्यानंतरच हा धान उचलला जाईल आणि भरडण्यासाठी नेला जाईल.