काही मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार आमने सामने असणार आहेत. त्यामुळे नेते कोणाचा प्रचार करणार याची उत्सुकता आहे.
ऐन दिवाळीत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून काल अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. २८८ जागांसाठी सुमारे १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दोन प्रमुख आघाड्यांसह मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्थानिक आघाड्या, छोटे पक्ष देखील मैदानात उतरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. आपल्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अखेरच्या दिवशी बंडखोरीचा मार्ग पत्करला आहे.
कित्येक दिवसांच्या चर्चा आणि बैठकांनंतरही महायुतीतील प्रमुख पक्ष योग्य समन्वय साधू शकले नाहीत. शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार निश्चित झालेले नव्हते, त्यामुळे एकाच मतदारसंघात दोन-दोन उमेदवार जाहीर करण्यात आले. ४ नोव्हेंबरपर्यंत काही जण उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. मात्र सध्याच्या घडीला ५ मतदारसंघांमध्ये महायुतीचेच उमेदवार आमने सामने आहेत.
हेही वाचा-Devendra Fadanvis on CM : ‘आता मुख्यमंत्रीपदाची लालसा राहिली नाही…’; देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
अणुशक्तीनगर
अविनाश राणे- शिवसेना (शिंदे)
सना मलिक- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
देवळाली मतदारसंघ
सरोज अहिरे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार)
राजश्री अहिरराव – शिवसेनेना (शिंदे)
हेही वाचा-“माझ्या पक्षाला कोर्टातून निशाणी मिळाली नाही…,” सत्तासंघर्षावरुन राज ठाकरेंचा टोला
मानखुर्द-शिवाजीनगर
नवाब मलिक- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
शिवाजी पाटील-शिवसेना (शिंदे)
दिंडोरी
धनराज महाले- शिवसेना (शिंदे)
नरहरी झिरवाळ-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
कित्येक दिवसांपासून महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात बैठका, चर्चांचा धडाका सुरू आहे. तरी जगावाटपात २८८ जागांवर एकमत झालं नाही. काही जागांवर तिढा कायम आहे. त्यामुळे काही जागांवर तिन्ही पक्षांनी उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. सोमवारी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल तर ठीक नाहीतर तिन्ही पक्षांना एकमेकांविरोधात लढाव लागणार आहे.
महायुती विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहे. तिन्ही पक्षांच राज्यात सरकारही आहे. मात्र काही जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्र लढले तर युतीतील प्रमुख पक्ष कोणाचा प्रचार करणार याची उत्सुकता असेल. इतर मतदारसंघात प्रचाराचे मुद्दे सारखेच असणार आहेत, मात्र विरोधात लढणाऱ्या या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार प्रतिस्पर्धी असल्यामुळे नेमका कोणत्या मुद्द्यावर प्रचार करणार हा ही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.