Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udayanraje Bhosale: मेलो तरी चालेल, पण…; महापुरूषांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांना उदयनराजेंचा थेट इशारा

दोन-तीन दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 07, 2025 | 12:29 PM
पक्षचिन्ह की आघाडी साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष

पक्षचिन्ह की आघाडी साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

सातारा :  गेल्या काही दिवसांपासून महापुरूषांबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्या विरोधात माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ महापुरूषांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्याविरोधात या अधिवेशनातच कायदा करावा. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शित्रा झाली पाहिजे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांना जातीचे किंवा पक्षाचे नसतात, त्यांच्यात फक्त विकृती असते. कोरटकर असो वा अबू आझमी ही फक्त नावे आहेत. भविष्यात अजून कोणी सोम्या गोम्या येतील, पण अशांना शिक्षा झाली तर  पुन्हा कोणी हिंमत करणार नाही’ अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने होणाऱ्या बेताल वक्तव्यांवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारकडे अशा लोकांची ‘नसबंदी’ करण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.”बेताल वक्तव्य करणाऱ्यांसाठी याच अधिवेशनात कायदा आणा आणि त्यांना किमान १० वर्षांची शिक्षा द्या,” अशी ठाम भूमिका उदयनराजेंनी घेतली. प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून त्यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेत सरकारला खडे बोल सुनावले.

सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा करण्याची मागणी

पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले यांनी सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा करण्याचीही गरज असल्याचे स्पष्ट केले.

“सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा विपर्यास करून समाजात चुकीचे संदेश दिले जात आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने तातडीने समिती नेमावी आणि कठोर कायदा करावा,” असे ते म्हणाले.

याशिवाय, शासनमान्य इतिहास समोर आल्यास अनेक विकृत लोकांची ‘नसबंदी’ होईल, अशा कठोर शब्दांत त्यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना फटकारले.

भाजपचा बचाव, पण विकृत मानसिकतेवर हल्लाबोल

प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले, “विकृत लोकांना कोणताही पक्ष किंवा जात नसते. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे सांगत त्यांनी भाजपचा बचावही केला.

राज्यात महापुरुषांचा अपमान करणाऱ्या घटनांवरून वातावरण तापले असून, उदयनराजे यांच्या या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच “कोणाकडे कोणतेही संरक्षण असले तरी एखाद्याची मानसिकता ‘मेलो तरी चालेल, पण याला खलास करणार’ अशी झाली, तर कोणही त्याला रोखू शकत नाही. त्यामुळे अशी वेळ येऊ देऊ नका,” असे उदयनराजेंनी असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे. उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबच्या समाधीच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चावरही नाराजी व्यक्त केली. “औरंगजेब काही देव नव्हता, तो इथला नव्हता. शिवाजी महाराजांनी धर्मस्थळे वाचवली, पण औरंगजेबाने त्यांच्याविरोधात काम केले. मग त्याची समाधी जपायची काय गरज?” असा सवाल करत, “तो एक लुटारू आणि चोर होता,” असे स्पष्ट शब्दांत उदयनराजेंनी सांगितले.

सरकारवर दबाव वाढला

उदयनराजेंच्या या तीव्र वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी त्यांनी केली असून, आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Make a law against those who make absurd statements against great men udayanraje bhosale is angry nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता
1

राजकीय पक्षांची चिंता वाढणार? मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनावर मंत्री शिवेंद्रराजेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘याबाबतचा निर्णय…’
2

साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनावर मंत्री शिवेंद्रराजेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘याबाबतचा निर्णय…’

पक्षचिन्ह की आघाडी? साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष
3

पक्षचिन्ह की आघाडी? साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.