Satara District Bank Election: बँकेतील बैठकीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरुची निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
उदयनराजेंनी आपली भूमिका ही सहकाराच्या हिताच्या दृष्टीने असल्याचे स्पष्ट केले असले, तरी आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’ या उदयनराजेंच्या भूमिकेला प्रमुख राजकीय नेते आणि सहकार क्षेत्रातील गट कसा प्रतिसाद देतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल. बँकेचे हित, शेतकरीहित आणि राजकीय समीकरणे यामध्ये संतुलन…
Satara News : खाण-क्रशरला परवानगी देण्याची प्रक्रिया पुढे गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. गरज पडल्यास मुंबईतील मंत्रालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
एआय किंवा फोटो एडिटिंग तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या संदर्भात प्रसारित करणे गंभीर बाब असून, समाजमाध्यमांवर अशा प्रकारे बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
सभेच्या ठिकाणी उदयनराजे आणि रामराजे यांची लिफ्टमधून एकत्रित एन्ट्री झाली. व्यासपीठावर आल्यानंतर उदयनराजे यांनी जवळील चाफ्याचे फुल रामराजे यांना देत संवाद साधला. त्यानंतर दोघेही शेजारी बसले.
Satara News: कृष्णानगर येथील रहिवासी विजय गाडवे हे २६ ऑगस्ट रोजी रात्री फेसबुकवर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संबंधित एक रिल पाहत असताना कमेंट सेक्शनमध्ये काहींनी अक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचे निदर्शनास…
सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उदयनराजे समर्थक नगरसेवक अनुपस्थित राहिले. मात्र, कोरम पूर्ण झाल्याने ३० मिनिटांत ४६ विषयांना मंजुरी देत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सातारा मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या गळाभेटीने राजकीय चर्चांना उधाण आले. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या कानगोष्टींमुळे अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
आगामी काळातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरी उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोवई नाका येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि…
देगाव येथे युथ फाउंडेशनतर्फे आयोजित रोजगार महामेळाव्यात ४००० हून अधिक तरुणांनी भाग घेतला. २,००० पेक्षा जास्त जणांना नोकरीची संधी मिळाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वाचा सविस्तर…
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात अलीकडेच मनोमिलन झाले असून, दोघेही भाजपमध्ये सक्रिय आहेत. तरीही, स्थानिक पातळीवर त्यांच्या समर्थकांमध्ये एकजूट दिसून येत नाही
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या पाच जिल्ह्यातून तब्बल 1300 फार्मसी प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य परिषदेचे उद्घाटन…
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात सोनगाव येथे महत्त्वाची बैठक पार पडली. जागावाटप आणि समन्वयाबाबत ४५ मिनिटे चर्चा झाली.
आता आम्ही आघाडी म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून उमेदवारांच्या संदर्भाने एकत्र असून सातारकर पहिल्यांदाच पक्ष निवडणूक पाहत आहेत. मी अजिबात नाराज नाही. मात्र, नगराध्यक्षापदाचा फॉर्म मलाच भरायचा…
सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत. दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल. राजकीय महत्त्वकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत.