Maratha Seva Sangh honors all the women in Zilla Parishad on the occasion of Women's Day
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष, जेवणाला बसण्यासाठी कँटीन, त्यांच्या लहान मुलांना बसणे व खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमीत्त जिल्हा परिषदेतील सर्व महिलांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आला.
त्यामध्ये रूपाली रोकडे, अश्विनी सातपुते, सुनिता भुसारे, नम्रता मिठ्ठा, श्रीदेवी महामुरे, रजनी केकडे, प्रतिक्षा कांबळे, श्रद्धा गायकवाड, ज्योती माळी, अरूणा रांजने, ज्योती काटकर, प्रज्ञा कुलकर्णी, सुजाता कांबळे, ममता काशेट्टी, वैशाली रंपुरे, राजश्री रोजी, वैशाली शिंदे, स्मिता पोरेडी, पुजा हुच्चे, छाया क्षीरसागर, अर्चना निराळी, अनिता तुपारे, राणी तवटी, उषा भोसले,फरजाना शेख, रितू शिंदे, अश्विनी दोरकर, शशिकला म्हेत्रे, सुचिता जाधव, ज्योत्स्ना साठे आदी महिलांची उपस्थिती होती
मराठा सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून परिश्रम
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अनिल जगताप, सचिन साळुंखे, सुधाकर मानेदेशमुख सचिन जाधव, सचिन चव्हाण, चेतन भोसले, रोहीत घुले, अजित देशमुख, विशाल घोगरे, संजय चव्हाण, विठ्ल मलपे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, अभिजीत निचळ, संतोष नीळ, गणेश साळुंखे, विकास भांगे, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, राम चव्हाण, गणेश वटवटवाले, मुशीर कलादगी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गोडसे यांनी केले.