Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: IG जालिंदर सुपेकरांचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला

Marathi breaking live marathi - यापूर्वीच सुपेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येशी किंवा पिस्तूल परवाना देण्याच्या प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 30, 2025 | 09:44 PM
Top Marathi News Today: IG जालिंदर सुपेकरांचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates: पिंपरी-चिंचवड येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे आत्महत्या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर, हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

The liveblog has ended.
  • 30 May 2025 06:35 PM (IST)

    30 May 2025 06:35 PM (IST)

    “… याचा निर्णय गृह मंत्रालय करेल”; वैष्णवी मृत्यू प्रकरणावर पंकजा मुंडेंचे महत्वाचे विधान

    वैष्णवी हगवणेच्या कुटुंबाची भेतघेतल्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी आज वैष्णवीच्या आई-वडिलांची भेत घेतली. वैष्णवीवर जी वेळ आली ती वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये. आम्ही सर्वजण वैष्णवीसोबत आहोत. तिला न्याय मिळायलाच हवा. वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा तपास कोणाकडे द्यावा याचा निर्णय गृह मंत्रालय करेल. तिला न्याय मिळेल यात बद्दल कोणताही शंका माझ्या मनात नाही.”

  • 30 May 2025 05:39 PM (IST)

    30 May 2025 05:39 PM (IST)

    आरटीई’च्या संदर्भात मोठी बातमी; चौथ्या टप्प्यातील प्रवेशासाठी मुदतवाढ

    ठाण्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ‘आरटीई २५%’ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत टप्पा क्रमांक ४ मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना प्रवेश पूर्ण करण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी २९ मे पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र पालकांचा प्रतिसाद लक्षात घेता व काही अपूर्ण प्रवेश प्रक्रियेस संधी देण्यासाठी आता ही मुदत ०९ जून पर्यंत वाढविण्यात आल्याचं सांगितलं आहे.

  • 30 May 2025 05:38 PM (IST)

    30 May 2025 05:38 PM (IST)

    हॉटेलच्या बेडवर ४० वर्षीय पुरूषाचा मृतावस्थेत आढळला

    मध्य दिल्लीतील आराक्ष रोडवरील नबी करीम परिसरातील एका हॉटेलमध्ये एका पुरुषाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तो त्याच्या २६ वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये पोहोचला होता. जिथे त्याने रात्री ९ वाजेपर्यंत रूम बुक केली होती. त्याची ओळख ४० वर्षीय सचिन सागर अशी झाली आहे. तो रोशनरा रोड सब्जी मंडी परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होता. सचिन हा एक व्यापारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्या खोलीत शारीरक संबंध वाढवणारी औषधे सापडली आहेत. ज्याचा सील उघडा होता. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात सचिनचा मृत्यू लैंगिक उत्तेजन वाढवणाऱ्या औषधांच्या जास्त सेवनामुळे झाल्याचे उघड झाले आहे.

  • 30 May 2025 04:22 PM (IST)

    30 May 2025 04:22 PM (IST)

    आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह झाला बंद

    आशियाई बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (३० मे) आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. अमेरिकेच्या एका अपील न्यायालयाने गुरुवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले सर्वात मोठे शुल्क तात्पुरते पुनर्संचयित केले. यामुळे आयटी शेअर्समध्ये घसरण झाली आणि बाजार खाली घसरला.

    आज बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ८१,४६५.६९ अंकांनी घसरून उघडला. ट्रेडिंग दरम्यान बहुतेक वेळा ते लाल चिन्हात राहिले. एकेकाळी तो ८१,२८६.४५ अंकांवर घसरला होता. शेवटी, सेन्सेक्स १८२.०१ अंकांनी किंवा ०.२२% ने घसरून ८१,४५१.०१ वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी-५० आज थोड्याशा घसरणीसह २४,८१२ अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान तो २४,७१७.४० अंकांवर घसरला होता. तो अखेर ८२.९० अंकांनी किंवा ०.३३% ने घसरून २४,७५०.७० वर बंद झाला.

  • 30 May 2025 04:18 PM (IST)

    30 May 2025 04:18 PM (IST)

    अखेर 10 दिवसांनंतर फरार निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

    वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण फरार होता. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याचा शोध घेतला आहे.

  • 30 May 2025 03:53 PM (IST)

    30 May 2025 03:53 PM (IST)

    नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा

    प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

  • 30 May 2025 03:50 PM (IST)

    30 May 2025 03:50 PM (IST)

    500 रुपयांची नोट होणार बंद?

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा त्यांची जुनी मागणी केली आहे. त्यांनी केंद्र सरकारला 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या पावलामुळे भ्रष्टाचार संपेल असा नायडूंचा विश्वास आहे. नायडू म्हणाले की 2016 मध्ये सरकारने नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींना डिजिटल चलन सुरू करण्याचा सल्ला दिला होता. डिजिटल चलनातून पेमेंट केल्यास भ्रष्टाचार शोधणे सोपे होऊ शकते. ते म्हणाले की राजकीय देणग्या आणि खर्च डिजिटल पेमेंटद्वारे शोधता येतील आणि त्यात अधिक पारदर्शकता येईल.

  • 30 May 2025 03:18 PM (IST)

    30 May 2025 03:18 PM (IST)

    शेअर बाजारात गुंतवणूक अन् अभिनेता अर्शद वारसीसह ५९ जण ५ वर्षांसाठी बॅन

    साधना ब्रॉडकास्टचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस करणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंशी संबंधित प्रकरणात बाजार नियामक सेबीने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि इतर ५७ संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली आहे. नियामकाने वारसी आणि त्यांची पत्नी मारिया यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला .

  • 30 May 2025 03:17 PM (IST)

    30 May 2025 03:17 PM (IST)

    लोन मिळवून देण्याच्या नावावर लोकांना लागलाय ३३१४८ कोटींचा चुना

    देशातील डिजिटल पेमेंट आणि बँकिंग फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये लोक त्यांचे कष्टाचे पैसे गमावत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात, लोकांना फसवणुकीमुळे ३६,०१४ कोटी रुपये गमावले, जे मागील आकडेवारीपेक्षा तिप्पट आहे. यापैकी ९२ टक्क्यांहून अधिक फसवणूक कर्ज किंवा कर्ज खाती (म्हणजेच अॅडव्हान्स) मिळवण्याच्या नावाखाली झाली.

  • 30 May 2025 02:46 PM (IST)

    30 May 2025 02:46 PM (IST)

    आयएनएस विक्रांतवरून राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) पाकिस्तानवर हल्लाबोल केला आणि म्हटले की, यावेळी जर पाकिस्तानने काही चूक केली तर आम्ही दहशतवादाविरुद्ध अशा पद्धती वापरू ज्याचा शत्रू विचारही करू शकत नाही. यावेळी जर पाकिस्तानने काही केले तर आमचे नौदल सलामी देईल. "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. हे फक्त एक विराम, स्वल्पविराम आणि इशारा आहे. जर पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली तर भारताचे उत्तर आणखी कठोर असेल आणि यावेळी त्यांना सावरण्याची संधीही मिळणार नाही. पाकिस्तानने हे लक्षात ठेवावे की, जर एकीकडे आपले नौदल समुद्रासारखे शांत असेल तर दुसरीकडे समुद्रासारखे त्सुनामी आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.

  • 30 May 2025 02:15 PM (IST)

    30 May 2025 02:15 PM (IST)

    परीक्षा होणार एकाच सत्रात

    NEET PG 2025 साठी तयारी करत आहात? मग या बातमीवर लक्ष द्या. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निणय जाहीर केला आहे की यंदाची NEET PG 2025 परीक्षा एकाच सत्रात घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (NBE) निर्णयाला न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संजय कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निर्णय दिला. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आल्यास विद्यार्थ्यांमध्ये असमानता निर्माण होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सविस्तर वाचा

  • 30 May 2025 12:54 PM (IST)

    30 May 2025 12:54 PM (IST)

    'गोकुळ'च्या अध्यक्ष पदासाठी अडीच तास खलबत्त

    महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी जवळपास अडीच तास खलबत्त झाली. आज संचालक मंडळाच्या मीटिंग समोर धक्कादायक नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचाच अध्यक्ष करण्यासाठी अजित नरके, नाविद मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे आणि अमर पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 30 May 2025 12:21 PM (IST)

    30 May 2025 12:21 PM (IST)

    कोरोनाची चौथी लाट येणार? पुन्हा लॉकडाऊन

    भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1255 वर तर आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर केरळ, महाराष्ट्र, दिल्लीसह, उत्तर प्रदेशातही कोरोनाच्या नवीन प्रकारांचे रुग्ण सातत्याने येत आहेत. अशा परिस्थितीत आता कोरोनाची चौथी लाट येते की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचदरम्यान आता कोविडच्या वाढत्या धोक्यात BHU च्या एका शास्त्रज्ञानेही एक मोठा दावा केला आहे.

    सविस्तर बातमी: कोरोनाची चौथी लाट येणार? पुन्हा लॉकडाऊन…, पुढील २८ दिवसांत असं काय घडणार?

  • 30 May 2025 11:35 AM (IST)

    30 May 2025 11:35 AM (IST)

    आषाढी एकादशीला ‘या’ वाहनांना टोल माफी

    आषाढी वारीबाबत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. वारकऱ्यांना विमा संरक्षण आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच वारकऱ्यांना चालताना कोणते अडथळे निर्माण होऊ नये म्हणून वारी मार्गावरील रस्ते दुरुस्त केले जाणार आहे. त्याचबरोबर पाणी, वीज आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • 30 May 2025 10:38 AM (IST)

    30 May 2025 10:38 AM (IST)

    Airtel ने अपडेट केला हा रिचार्ज प्लॅन

    एयरटेलने भारतात पोस्टपेड यूजर्ससाठी 2,999 रुपयांचा इंटरनेशनल रोमिंग (IR) प्लॅन अपडेट केला आहे. कंपनीचा हा प्लॅन 10 दिवसांची वॅलिडिटी देतो. शिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड डेटा एक्सेस दिला जातो. मात्र यामध्ये 5GB FUP लिमिट सेट केलेली होती. आता कंपनीने हाई-स्पीड डेटा लिमिट डबल केली आहे. आता ही लिमिट 10GB झाली आहे. यानंतर चार्ज आकारला जाणार आहे. कंपनीने केलेले हे अपडेट यूजरसाठी फायद्याचं ठरणार आहे. जिथे आधी 5GB ची लिमिट होती, तीच लिमिट आता कंपनीने डबल केली आहे. त्यामुळे आता युजर्सना एक्सट्रा डेटाचा आनंद घेता येणार आहे. एक्स्ट्रा डेटाशिवाय, प्लॅनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

  • 30 May 2025 10:37 AM (IST)

    30 May 2025 10:37 AM (IST)

    अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लाँच झाले हे नवीन Smartphone

    Red Magic 10S Pro आणि Red Magic 10S Pro+ हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही हँडसेटमध्ये 3nm ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite ‘Leading Edition’ प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये तगडी बॅटरी दिली आहे, ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. दोन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. Red Magic 10S Pro आणि 10S Pro+ मध्ये 6.85-इंच 1.5K (1,216×2,688 पिक्सेल) OLED BOE Q9+ डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 960Hz टच सँपलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि 100 परसेंट DCI-P3 कलर गॅमेट कवरेज आहे.

  • 30 May 2025 10:29 AM (IST)

    30 May 2025 10:29 AM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर एकाने दिली आत्महत्येची धमकी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी ३९ वर्षीय व्यक्तीने दक्षिण मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या सरकारी निवासस्थानाबाहेर पोहोचून स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली परंतु तो असे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून १०० मिली पेट्रोलने भरलेली बाटलीही जप्त केली, असे त्यांनी सांगितले.

  • 30 May 2025 10:23 AM (IST)

    30 May 2025 10:23 AM (IST)

    कराची इंटरनेशनल एयरपोर्टच्या वॉशरूममध्येही दुष्काळ

    पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यातच त्यांनी चिनाब नदी आणि सिंधू नंदीचा प्रवाह रोखून धरला ज्यामुळे पाकिस्तानला पाणी मिळू नये. अशात यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची कमी निर्माण झाली. लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या बातम्या नेहमीच समोर येत होत्या मात्र आता याबाबतच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यातून पाकिस्तानचे पाणीटंचाईमुळे झालेले भीषण हाल दिसून आले

  • 30 May 2025 09:34 AM (IST)

    30 May 2025 09:34 AM (IST)

    जून महिन्यात एकूण १२ दिवस बँकांना सुट्टी

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) प्रत्येक महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. या यादीनुसार, जून महिन्यात एकूण १२ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यामध्ये आठवड्याचे शनिवार-रविवार तसेच विविध सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्यांची यादी उपलब्ध करून देण्यात येते. विविध राज्यांतील सणवार, स्थानिक उत्सव, तसेच राष्ट्रीय सुट्ट्यांनुसार या सुट्ट्या वेगळ्या असतात. याशिवाय, देशभरातील बँका दरमहा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात, तर पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार कार्यरत असतो.

  • 30 May 2025 09:14 AM (IST)

    30 May 2025 09:14 AM (IST)

    शेअर बाजारावर आज होणार या घटकांचा परिणाम

    शेअर बाजारातील कालच्या चढउतारानंतर आज बाजार कसा असणार, गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान, याबाबत तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सेक्टर रोटेशन आणि स्टॉक स्पेसफिक अ‍ॅक्शन, Q4 रिजल्ट्स, मायक्रो इकोनॉमी संकेत आणि अमेरिका ट्रॅरिफवरील बंदी या सर्व घटकांमुळे आज निफ्टी आणि सेन्सेक्स एका विशिष्ट श्रेणीसह व्यवहार करणार आहेत.  असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होणार आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स देखील सपाट पातळीवर सुरुवात करू शकतात.

  • 30 May 2025 09:13 AM (IST)

    30 May 2025 09:13 AM (IST)

    सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, चांदीच्या किंमतही नरमल्या!

    30 मे रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,703 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,894 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,277 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 88,940 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,030 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,770 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99.80 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,800 रुपये आहे.

  • 30 May 2025 08:26 AM (IST)

    30 May 2025 08:26 AM (IST)

    गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीत नवा ट्विस्ट; महायुतीकडून दबाव

    कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा वळण आला आहे. अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोकुळचा अध्यक्ष महायुतीकडूनच व्हावा, यासाठी वरिष्ठ नेत्यांचा जिल्ह्यातील नेत्यांवर दबाव असल्याची माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाची बैठक उद्या होणार असून, सत्ताधारी गटाकडून शशिकांत पाटील चूयेकर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत पेच निर्माण झाला आहे.

  • 30 May 2025 08:22 AM (IST)

    30 May 2025 08:22 AM (IST)

    चंद्रहार पाटील शिंदे गटात जाण्याची शक्यता

    विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. आता सांगलीतील शिवसेना नेते चंद्रहार पाटील हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रहार पाटील यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. या भेटीनंतर चंद्रहार पाटील लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

  • 30 May 2025 08:22 AM (IST)

    30 May 2025 08:22 AM (IST)

    हगवणे बाप-लेकांचा आणखी एक कारनामा समोर

    शहरातील हगवणे पिता-पुत्रांच्या फसवणूक आणि गुंडगिरीच्या घटनांची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्याविरोधात अनेक गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. आता आणखी एका व्यक्तीने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावचे रहिवासी प्रशांत येळवंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत लता राजेंद्र हगवणे आणि शशांक राजेंद्र हगवणे यांनी जेसीबी (JCB) खरेदी प्रकरणात आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political crime sports social 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 08:14 AM

Topics:  

  • Maharashtra Breakig News

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद
1

Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद

Top Marathi News Today: अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा
2

Top Marathi News Today: अखेर 12 दिवसानंतर इराण-इस्त्रालय देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा

Top Marathi News Today: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; चार मृत, अनेक गंभीर
3

Top Marathi News Today: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; चार मृत, अनेक गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.