Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : घोटाळेबाज बिल्डरांना अभय कोणाचं ? 14 वर्ष घराचा ताबा मिळाला नाही, संतप्त नागरिकांचं आमरण उपोषण

कल्याणमध्ये नागरिकांनी हक्काच्या घरासाठी आमरण उपोषण केलं आहे. चिकणघर येथील शांतिदूत सोसायटीच्या सभासदांचे विकासकाच्या विरोधात आमरण उपोषण केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 03, 2025 | 05:40 PM
Kalyan News : घोटाळेबाज बिल्डरांना अभय कोणाचं ? 14 वर्ष घराचा ताबा मिळाला नाही, संतप्त नागरिकांचं आमरण उपोषण
Follow Us
Close
Follow Us:

कल्याणमध्ये नागरिकांनी हक्काच्या घरासाठी आमरण उपोषण केलं आहे. चिकणघर येथील शांतिदूत सोसायटीच्या सभासदांचे विकासकाच्या विरोधात आमरण उपोषण केलं आहे. रहिवाश्यांना फसवणाऱ्या घोटाळेबाज शितोळे बिल्डर व त्याचा पार्टनर चेतन सराफ तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांच्यावर तात्काळ अटकेच्या कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तात्काळ कारवाईच्या आदेशानंतरही ठाणे पोलीस आयुक्त कारवाई का करत नाहीत, त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे? असा सवाल माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.

शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामात घोटाळा करणाऱ्या आणि राहिवाश्यांची दिशाभूल करणाऱ्या अवंती ग्रुप एल एल पी चे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्या विरोधात तात्काळ कारवाईचे आदेश असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याच्या निषेधार्थ भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शांतीदूत सोसायटी रहिवाशांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, तीन वर्षांत घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि आज १४ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांना घरे बांधून दिली नाहीत. तसेच येथील रहिवाश्यांना अंधारात ठेऊन त्यांची जमीन चुकीच्या पद्धतीने बँकेकडे गहाण ठेऊन त्यावर ३१८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे प्रोजेक्ट दाखवून त्या आधारे ४०० जणांची बुकिंग घेतली. त्या ४०० लोकांच्या बुकिंगच्या लोनच्या हप्त्याच्या माध्यमातून जवळपास १५० कोटी रुपये विकासक श्रीकांत शितोळे व त्यांच्या भागीदाराच्या खात्यात जमा झाले. आज 14 वर्षे उलटून गेल्यानंतरही आजतागायत त्याने इमारत बनवून दिली नाही.

३१८ कोटी व बुकिंगचे १५० कोटी म्हणजे एकूण ४६८ कोटी रुपयांचा घोटाळा या विकासकाने केलेला आहे. या विकासकाने येथील रहिवाश्यांची फसवणूक केली, बँकेची फसवणूक केली. म्हणून आमची मागणी आहे की, विकासक श्रीकांत शितोळे व त्यांचे सहकारी चेतन सराफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक केली जावी तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांना सुद्धा तात्काळ अटक केली जावी. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, येथील राहिवाश्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण असेच सुरू राहणार आहे, असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.

पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आमचे निवेदन दिले, तेव्हा त्यांनी स्वतः ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला व तात्काळ कारवाईचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला आज बरेच दिवस उलटून देखील ठाणे पोलीस आयुक्तांनी आजतागायत त्यावर कारवाई केलेलीं नाही, त्यासाठी त्यांचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. मुख्यमंत्री व ग्राहमंत्र्यांचे ऐकत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत, पोलीस प्रशासनावर एवढा कोणता दबाव आहे, असा सवाल नरेंद्र पवार यांनी या प्रसंगी उपस्थित केला.म

Web Title: Members of shantidoot society in kalyan have gone on a hunger strike to death against shitole builder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • kalyan news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.