KDMC News Marathi: मनसे नेते राजू पाटील यांनी स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले आहेत. फेरीवाल्यांनी रस्ता व्यापला आहे.
राज्यात लूटमार करणारा सराईत चोरटा सलमान इराणी फिल्मी स्टाईलने अटकेत; नातेवाईकांनी पोलिसांवर हल्ला केला तरी मुसक्या आवळल्या. पनवेल पोलिसांच्या कारवाईत अटकेचा थरार सीसीटीव्हीत कैद.
कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी या शाळेने धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांना टिळा किंवा टिकली लावण्यास प्रतिबंध लावला. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
कल्याणमधील वालधुनी ते बाईचा पुतळा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील खड्डे देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. याच वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणीला विरोध दर्शविला जात आहे. या नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर बंदची हाक दिली आहे.
पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी वर्ग गुरुवार सायंकाळपासून तब्बल २२ तास अंधारात होता.अचानक झालेल्या बिघाडामुळे गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला.
कल्याणमध्ये केडीएमसीच्या प्रभाग रचनेविरोधात २७ गाव संघर्ष समितीने तीव्र आंदोलन उभारले आहे. समितीचा ठाम पवित्रा आहे की, “आम्हाला केडीएमसीत रहायचे नाही.”
शेतकऱ्यांसाठी असलेल्या राखीव इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला आहे. त्यामुळे कृषी बाजार समिती सध्या वादाच्या भोवऱ्यात दिसून येत आहे.
KDMC News : आगामी महापालिका निवडणूकीनंतर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा महासचिव सिंग यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ पासून शिवसेना भाजपची सत्ता आहे.