ashish shelar
मुंबई : हिंदू सणांना (Hindu Festivals) परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली. हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला (Gudhipadwa) निघणाऱ्या शोभायात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुंकाना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानसभेत केली होती. त्यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्याही स्पष्ट सूचना आल्या नाहीत. त्यामुळे आज इलेक्ट्रॉनिक मिडियाशी बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
[read_also content=”मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका, ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग’मध्ये ‘राख’ चित्रपटासाठी पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार https://www.navarashtra.com/movies/sandeep-pathak-received-best-actor-award-for-raakh-in-couch-film-festival-spring-nrsr-261238.html”]
शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारने गुढीपाडव्याला शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांना परवानगी देण्याची स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्या ज्या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो ? असा सवाल त्यांनी केला. तसेच मुंबई पोलीसांनी मुंबईत १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्यासाठी दहशतवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील, अशी माहिती पोलीसांकडे आल्याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्यात आले आहे.
मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्या हाताला लकवा का मारतो ? आणि रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल करीत आमदार ॲड आशिष शेलार यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून या दोन्ही सणांना परवानगी देण्यात याव्यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये आम्ही या मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भाजपा सहभागी होईल, असेही शेलार यांनी आज जाहीर केले.