Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनाला मानवी चेहरा देण्याबरोबरच अधिक वेगवान, पारदर्शक केले असल्याचे मंत्री शेलार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 08:33 PM
“…तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य”; सायबर धोक्यांबाबत आशिष शेलारांचे भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

एआय लोकशाही सशक्त करण्याची संधी
महाराष्ट्राने केला एआयचा प्रशासनात प्रभावी वापर
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली: एआय ही केवळ तंत्रज्ञान क्रांती नसून, ती लोकशाही अधिक सशक्त करण्याची संधी आहे. सुरक्षित आणि स्मार्ट शासनाची गरज लक्षात घेता महाराष्ट्राने एआयचा प्रशासनात प्रभावी वापर केला असल्याचे सांगून महाराष्ट्र या तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र बनले असल्याचा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनाला मानवी चेहरा देण्याबरोबरच अधिक वेगवान, पारदर्शक केले असल्याचे सांगून मंत्री ॲड. शेलार यांनी महाराष्ट्र शासनाने केलेल्या डिजिटल प्रवासाची सविस्तर माहिती दिली. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या ‘महाक्राईम’ प्रकल्पामुळे गुन्हेगारी रोखणे, तपास प्रक्रिया गतिमान करणे आणि पारदर्शकता वाढविणे शक्य झाले. या प्रणालीचे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनीही कौतुक केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात महाआयटी एक प्रगत ‘इंटेलिजेंट गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर’ उभारत असून हे क्लाउड-नेटिव्ह आणि एपीआय-आधारित मॉडेल आहे. या माध्यमातून स्मार्ट भरती प्रक्रिया, शहरी स्थानिक संस्थांसाठी एआय-आधारित मालमत्ता मॅपिंग, रिअल-टाइम नागरी डॅशबोर्ड, वाहतूक व पूर व्यवस्थापनासाठी तात्काळ डेटा विश्लेषण, हवामान आणि नागरी तक्रार निवारण प्रणाली हे उपक्रम राबविले जात असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले. एआयचा वापर प्रशासनाला नागरिकांपासून दूर नेण्यासाठी नव्हे, तर अधिक संवेदनशील, अचूक आणि प्रतिसादक्षम करण्यासाठी केला जात असल्याचेही मंत्री ‍डॉ. शेलार यांनी स्पष्ट केले.

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

वाढत्या सायबर धोक्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जसे मानवी शरीरासाठी आरोग्य आवश्यक आहे. तसेच समाजासाठी डिजिटल आरोग्य अनिवार्य आहे. दिशाभूल करणारी माहिती आणि सायबर हल्ल्यां विरोधात मजबूत सायबर सुरक्षा आणि हायब्रिड पडताळणी यंत्रणा उभारण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. तरी जास्तीत जास्त जागतिक तंत्रज्ञान संस्थानी महाराष्ट्रासोबत भागीदारी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

प्रशासकीय दृष्टिकोनातून सुरेश सेठी यांनी स्पष्ट केले की, भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत मजबूत आहे. आधार आणि यूपीआयसारख्या व्यासपीठांवर एआयचा स्तर वापरून आपण भविष्यसूचक प्रशासनाकडे वळू शकतो. यामुळे सरकारी योजनांचे लाभ गरजूंपर्यंत मागणी करण्यापूर्वीच पोहोचवता येतील.  मात्र हे करताना पारदर्शक, स्पष्टीकरणात्मक आणि मानवी हस्तक्षेपास वाव देणारे एआय तंत्रज्ञान असणे गरजेचे आहे. रणजित गोस्वामी यांनी टाटा समूहाच्या विचारसरणीनुसार तंत्रज्ञान हे केवळ कार्यक्षमता वाढवण्यासाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी असावे. सर्व सरकारी विभागांनी एकात्मिक डेटाबेस वापरून नागरिकांना अधिक सुलभ सेवा द्याव्यात, अशी भूमिका मांडली.

Web Title: Minister ashish shelar said about strong democracy with ai technology cyber security marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Ashish Shelar
  • technology news

संबंधित बातम्या

Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6G Prototype : स्मार्टफोन युजर्ससाठी गुड न्यूज; जपानमध्ये 6G चा प्रयोग यशस्वी, 5G च्या तुलनेत २० पट अधिक स्पीड
2

6G Prototype : स्मार्टफोन युजर्ससाठी गुड न्यूज; जपानमध्ये 6G चा प्रयोग यशस्वी, 5G च्या तुलनेत २० पट अधिक स्पीड

स्क्रीनविरहित  फिटनेस ट्रॅकरचा वाढता ट्रेंड! फॅशनसोबतच आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीवर ठेवता येणार स्मार्ट नजर
3

स्क्रीनविरहित फिटनेस ट्रॅकरचा वाढता ट्रेंड! फॅशनसोबतच आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीवर ठेवता येणार स्मार्ट नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.