टेंभूर्णी/ संतोष वाघमारे: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. राज्यात २८८ जागांसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेते आपल्या उमेदवारांसाठी राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. उजनी धरणावरून केलेली सिना माढा सिंचन योजना व भीमा सीना जोड कालवा योजना व त्यामुळे माढा तालुक्यात सुजलाम सुफलाम नंदनवन झालेले आहे, हे सूर्यप्रकाश इतके स्वच्छ सर्वाना दिसत आहे. मागील तीस वर्षात हरितक्रांती धवल क्रांती कृषी औद्योगिक क्रांती या व इतर अनेक माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणलेले आहे हे आपणा सर्वांच्या समोर आहे .या सुजलमसूफलम झालेल्या माढा तालुक्याला कुणाची दृष्ट लागू देऊ नका व मी केलेल्या विकास कामांची पोहोच म्हणून रणजीत बबनराव शिंदे यांच्या सफरचंद चिन्हा पुढील बटण दाबून त्यांना बहुमताने विजयी करा असे आव्हान आमदार बबनराव शिंदे यांनी उपळाई बुद्रुक येथील जाहीर प्रचार सभेप्रसंगी केले आहे.
आमदार बबनराव शिंदे यांनी जाधववाडी वैरागवाडी तुळशी उपळाई बुद्रुक व गावातून प्रचार दौऱ्यास दौरा केला ,सर्वत्र त्यांचे प्रचंड उत्साहाने स्वागत करण्यात येत होते. याप्रसंगी शिवाजीराजे कांबळे प्रा. रवींद्र ननवरे प्रा. अनिल पाटील संजय पाटील भिमानगरकर शंभू मोरे, कैलास तोडकरी शहाजी चौरे शहाजी शिंदे नितीन बागल मुन्ना मोरे संदीप पाटील राजू गोटे अमोल चव्हाण गणेश काशीद डॉक्टर संतोष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार बबनराव म्हणाले, विरोधकांवर टीका करण्यास मला वेळच नाही. कारण मागील तीस वर्ष मी केलेली प्रचंड विकास कामे सांगण्यास मला वेळ कमी पडतो. ही निवडणूक रणजीत शिंदे यांनी जिंकल्यात जमा. फक्त तुम्ही करेक्ट कार्यक्रम राबवा व जागरूकपणे मतदारांना घरोघर जाऊन सफरचंद चिन्ह पोहचवावे व मतदान घडवून आणावे हे लक्षात ठेवा.
हेही वाचा: माढा विधानसभेत रणजीत शिंदेंचा विजय निश्चित; आमदार बबनराव शिंदेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त
याप्रसंगी प्राध्यापक रवींद्र ननवरे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी प्रचार सभेत केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला व हा ढोबळे म्हणजे एक नटरंगी आणि बोल घेवडा स्वार्थी राजकारणी असून जिकडे स्वार्थ असतो तिकडं सरड्याप्रमाणे रंग बदलणारा माणूस असल्याची टीका केली, त्यांच्या भाषणाला उपस्थित मोठ्या जनसमुदायाकडून टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रतिसाद दिला जात होता
जावयासारखाच त्यांच्या भावाचा सन्मान करा…
आमदार बबनदादा शिंदे म्हणजे वटवृक्ष आहेत, माढा तालुक्यात केलेल्या विकास कामांकडे दुर्लक्ष करून भुलभुलय्या करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवा .विक्रम बबनराव शिंदे या गावचे जावई आहेत व रणजीत शिंदे त्यांचे सख्खे भाऊ आहेत त्यामुळे या गावाने मोठे मताधिक्य देऊन जावयाच्या भावाचा मोठा सन्मान करावा. याप्रसंगी माजी कृषी सभापती संजय पाटील, भिमानगरकर , शंभू मोरे, आणि माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी समायोजित विचार व्यक्त करून रणजीत शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.