मविआचं सरकार आलं तर रोहित पवारांना मिळणार ही जबाबदारी: शरद पवारांनी कर्जतच्या सभेत जाहीरच करून टाकलं
विधानसभा निडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कर्जतमध्ये रोहित पवारांसाठी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी, रोहित पवार पहिल्या टर्ममध्ये केवळ आमदार होते, आता ते दुसऱ्या टर्मसाठी उभे आहेत. त्यांनी तुम्ही निवडून दिलं आणि महाविकास आघाडीच सत्ता आली तर मोठी जबाबदारी मिळेल, असं शरद पवारांनी जाहीरच करून टाकलं आहे.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
१९६७ साली मी आमदार होतो, त्यावेळी २७ वर्षांचा होतो. मात्र पहिल्या पाच वर्षात कोणतीही जबाबदारी किंवा मंत्रिपद आपल्याकडे नव्हतं. दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राज्यमंत्री, तिसऱ्या टर्ममध्ये मंत्री झालो आणि चौथ्या टर्ममध्ये राज्याचा मुख्यमंत्री झालो. आता रोहित पवारही पहिल्या टर्ममध्ये आमदार आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नाही.
यावेळी कर्जमधून तुम्ही रोहित पवारांना निवडून दिलं तर आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवू, असं आश्वासन शरद पवारांनी आज कर्जतच्या जनतेला दिलं. त्यामुळे रोहित पवारांकडे यावेळी मोठी जबाबदारी असण्याची शक्यता आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे भावी मुख्यमंत्रीही असू शकतात, असे संकेत शरद पवारांच्या आजच्या भाषणातून मिळत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते महायुतीसोबत गेले. त्यानंतर शरद पवारांसोबत काही मोजकेच आमदार राहिले होते. त्यात रोहित पवारही होते. शरद पवारांचा राजकीय वारस कोण अशी चर्चा सुरू झाली होती. सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहिल्या तर राज्यातील पोकळी कोण भरून काढणार, हा प्रश्न होता.
दरम्यान आमदार झाल्यापासून रोहित पवार राजकारणात राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. आंदोलने ते शरद पवार गटाची माध्यमांसमोर बाजू मांडण्याची जबाबदारी रोहित पवारांनी सांभाळली होती. त्यामुळे शरद पवार गटाला भावी राजकीय वारसदार मिळाल्याचीही चर्चा होती. अजित पवारांची जागा आता रोहित पवारांकडे येणार असंही बोललं जात होतं.
दरम्यान आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. शरद पवारांची रोहित पवारांचा मतदारसंघ कर्जत जामखेडमध्ये आज प्रचार सभा पार पडली. सभेला गर्दीही मोठी होती. यावेळी शरद पवार म्हणाले की, १९६७ साली मी आमदार होतो, त्यावेळी केवळ २७ वर्षांचा होतो. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या पाच वर्षात कोणतीही जबाबदारी किंवा मंत्रिपद आपल्याकडे नव्हतं. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये मात्र राज्यमंत्री, तिसऱ्या टर्ममध्ये मंत्री झालो आणि चौथ्या टर्ममध्ये राज्याचा मुख्यमंत्री झाल्यांचं त्यांनी सांगितलं. आता रोहित पवारही पहिल्या टर्ममध्ये कर्जत जामखेडमधून आमदार झाले आहेत. मात्र त्यांना यावेळी आम्ही कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. मात्र तुम्ही निवडून दिलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.