Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या वीज वितरण अधिकार्‍यांना दिली तंबी; आंदोलनाचा इशारा देताच दिली वितरणाची हमी

मंगळवेढामध्ये वादळी वार्‍याने रात्री 8 वाजता वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरवासीयांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 06, 2025 | 04:31 PM
Mns aggressive as electricity distribution officer not present in Solapur mangalwedha

Mns aggressive as electricity distribution officer not present in Solapur mangalwedha

Follow Us
Close
Follow Us:
मंगळवेढा : मंगळवेढा वीज वितरण कंपनीला मनसेने गेट बंद आंदोलनाचा इशारा देताच वीज वितरण अधिकारी नमले असून त्यांनी भविष्यात यापुढे वीज न गायब होण्याची लेखी हमी दिल्याने मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांनी सोमवारी पुकारलेले गेट बंद आंदोलन तुर्त माघारी घेतले आहे.
शनिवार दि.26 एप्रिल रोजी मंगळवेढयात भयानक वादळ सुटल्याने रात्री 8 वाजता संपूर्ण शहरातील गेलेली वीज गेली. तब्बल 18 तासांनी सायंकाळी 4.15 वाजता संपूर्ण शहर सुरळीत झाले. अशी वस्तुस्थिती असताना वीज वितरणचे अधिकारी दुसर्‍या दिवशी सकाळी 7.12 मिनिटांनी शहराला वीज पुरवठा सुरु झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वीज गायब कालावधीत शहरवासीयांचे पुरे हाल झाले हे जीवनातही ते विसरु शकणार नाहीत अशी स्थिती होती. रात्रभर रुग्ण,लहान बालके,वृध्द यांनी अक्षरश: रात्र जागून काढली. वीजे अभावी सकाळी काही लोकांनी पाण्याअभावी अंघोळी करु शकले नाहीत अशी वस्तुस्थिती असलेबाबत नागरिकांनी प्रसार माध्यमाजवळ नाराजी व्यक्त केली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या घटनेबाबत मनसेचे नारायाण गोवे यांनी प्रत्यक्ष वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर त्यांना उपस्थित कोणतेही अधिकारी असल्याचे निदर्शनास आले नव्हते. या सर्व घटनामुळे मनसेने सोमवार दि.5 रोजी वीज वितरण कार्यालयाचे गेट बंद आंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. येथील उपकार्यकारी अभियंता व मनसेचे नारायण गोवे व अन्य कार्यकर्ते आंदोलनाबाबत चर्चा झाली. वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांचे मन परिवर्तन केले. या चर्चेत नैसर्गिक आपत्तीमुळे उच्चदाब व लघुदाब वाहिनी यावर पडझड झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत होता. दि.27 रोजी 11 के.व्ही. मंगळवेढा वाहिनी सकाळी 7.12 मिनीटांनी चालू झाली. त्यानंतर काही भागातील नादुरुस्त कामे पुर्ण करुन सायंकाळी 6 वाजता संपूर्ण शहराचा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात आला. ही सर्व कामे जनमित्र व अधिकारी यांच्या मदतीने करण्यात आली. अपात्कालीन कालावधीत अधिकारी व कर्मचार्‍यांचे मोबाईल बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
तसेच तेथील ऑपरेटरला व्यवस्थित बोलण्याच्या सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी तसेच जनमित्र यांना यापुढे मुख्यालयात राहणेस सुचना देण्यात आल्या आहेत. पुढील काळात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची महावितरणने पुर्ण खबरदारी घेतली असून आपणास विनंती करण्यात येते की आपले आंदोलन करण्याच्या निर्णयापासून परावर्त व्हावे अशा आशयाच्या मजकूराचे लेखी पत्र उपकार्यकारी अभियंता मंगळवेढ्याचे महेश शिपूरे यांनी आंदोलनकर्ते मनसेचे नारायण गोवे यांना दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत मंगळवेढाचे मनसे जिल्हा समन्वयक नारायण गोवे म्हणाले की, “दि.26 एप्रिल रोजी मंगळवेढा शहरात वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी झाडे पडली. रात्री 8 वाजता वीज पुरवठा खंडीत होवून दुसर्‍या दिवशी 4.15 वाजता आला. या दरम्यान शहरवासीयांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले. नैसर्गिक आपत्ती घटना घडल्यानंतर अधिकार्‍यांनी येथे उपस्थित राहणे गरजेचे होते. तसे न झाल्यामुळे नागरिकांना सेवा देण्यास विलंब झाला. या प्रकरणी गेट बंद आंदोलनाचा इशारा देताच अधिकार्‍यांनी भविष्यात वीज जाणार नाही व अधिकारी,कर्मचारी येथे निवासी राहतील अशी लेखी हमी दिल्याने आंदोलन तुर्त स्थगित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Mns aggressive as electricity distribution officer not present in solapur mangalwedha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • electricity

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.