साईबाबा संस्थानच्या प्रसादासाठी मोजावे लागणार पैसे
शिर्डी : शिर्डी श्री साईबाबा संस्थानमध्ये मोफत प्रसाद भोजन दिले जाते. याच प्रसादाबाबत आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत भोजन दिले जाणार नाही. त्यासाठी आता टोकन पद्धतीने भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना कूपन दिले जाणार आहे.
साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना कूपन दिले जाणार आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील काऊंटरवर हे कूपन वितरित केले जाणार आहेत. सध्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारपासून (दि.6) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी संगितले.
दरम्यान, साई संस्थानच्या प्रसादालयात दररोज 50 ते 60 हजार भाविक भोजन करतात. मात्र, आता या प्रसादालयात जेवणासाठी कूपन आवश्यक असणार आहे. शिर्डी संस्थांनच्या भक्त निवासात देखील भोजनासाठी कूपन दिले जाणार आहे. तसेच प्रसादालयात देखील कूपन मिळण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. श्री शिर्डी साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्णय
दरम्यान, वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून शिर्डीत श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेत आहेत. मात्र, आता त्यासाठी कूपनची आवश्यकता भासणार आहे. त्यानंतर मोफत भोजन दिले जाणार आहे.